आ. जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
घुग्घुस येथील आ.किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात बुधवार,१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. तसेच ‘जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा’ राज्यगीत गाण्यात आले.’जय भवानी,जय शिवाजी’ चा जयघोष करण्यात आला.
आ.किशोरभाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात माजी.सरपंच संतोष नुने म्हनाले,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तारखेनुसार जयंती आहे. महाराष्ट्राचा ‘जाणता राजा’, अशी ओळख असणारे शिवराय हे पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत.
दूरध्वनीवरून संपर्क साधून आमदार किशोर जोरगेवार यांनी जाती-पातीच्या भिंती तोडून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जनतेला समान न्याय दिला. त्यामुळेच त्यांना रयतेचा राजा म्हणून संबोधले जाते. स्वराज्य निर्मितीचा त्यांचा ध्यास आणि त्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम हे सर्वानाच प्रेरणादायी आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषणा या उर्जा आणि सकारात्मकतेचा स्त्रोत असल्याचे प्रतिपादन केले.
याप्रसंगी माजी सरपंच संतोष नुने, साजन गोहणे, इमरान खान,अनुपू भंडारी,स्वप्नील वाढई,मुन्ना लोडे,सोनल भरटकर, सूरज मोरपाका,रमन तांड्रा, राजेंद्र लुटे,संतोष पाटील, शाम आगदारी, विनोद बोरपे, विशाली तुलसीदास ढवस,सुचीता लुटे,मुक्ता सुनिल धाबेकर,सुनिता रविंद्र धिवे,सुनिता पाटील, उषा आगदारी,वनिता निहाल,माया माडवकर,संध्या जगताप अल्का भांडारकर,सुशिला डकरे,सुनंदा सौदारी,जयश्री राजुरकर,कामिनी देशकर,नितु जयस्वाल,संगिता ठेंगणे,सविता गोहणे आदी उपस्थित होते.