छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उदात्त मानवी मूल्य जोपासणारा एकमेव राजा – शिवश्री प्रा. प्रविण देशमुख
चंद्रपूर :- पराकोटीच्या पराक्रमाला पराकोटीची संवेदनशीलता असणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, सर्वधर्म सहिष्णुता या मूल्यांना जोपासणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, शेतकरी, स्त्रिया, आबाल, वृद्ध या सर्वांना अभय दिलं आणि लोक कल्याणकारी राज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केलं म्हणूनच उदात्त मानवी मूल्य जोपासणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा.प्रवीण देशमुख यांनी केले ते छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती ऊर्जानगर तर्फे कामगार मनोरंजन केंद्र येथे आयोजित शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला जाहीर व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बळवंत ठाकरे अध्यक्ष कामगार मनोरंजन केंद्र ऊर्जानगर, प्रमुख व्याख्याते शिवश्री प्रा. प्रविण देशमुख तसेच प्रमुख अतिथी पंकज ढेंगारे माजी पंचायत समिती सदस्य,संजय जुनारे ,विजय राठोड यांची उपस्थिती होती. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवचरित्र व्याख्याते मा.प्रा.शिवश्री प्रविणदादा देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगावर विस्तुत माहिती देऊन शिवचरित्र सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष बळवंत ठाकरे यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊन अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रकाश टाकला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय जुनारे यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश पाटील यांनी केले व आभार प्रमोद राठोड यांनी मानले.या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व बहुसंख्य ऊर्जानगर वासीयांची उपस्थिती होती असे देवराव कोंडेकर यांनी कळविले आहे.