क्रीडा, संस्कृती व एकतेचा संगम म्हणजे घुग्घूसचे महिला महोत्सव! – आ. सुधीर मुनगंटीवार
मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार क्रिडा व सांस्कृतिक महिला महोत्सवाची घुग्घूस येथे शानदार सांगता
बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन यांनी केले सर्वांना आपलेसे…
घुग्घुस स्थानिक मा.आ.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा प्रयास सखी मंचच्या वतीने दि.१५ फेब्रुवारी २०२५ शनिवार रोज सायंकाळ रोजी स्थानिक बांगडे ले-आउटवर मा.आ.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार क्रिडा व सांस्कृतिक महिला महोत्सव शानदार आयोजन करण्यात आले. या महोत्सवाला सुप्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री रवीना टंडन यांची उपस्थिती व घुग्घुसच्या महिलाशक्तीची उत्साहपूर्ण गर्दी लक्षणीय ठरली.
घुग्घुस शहराशी १९९५ पासूनचे नाते आहे. या भागाच्या विकासासाठी मी कायम प्रयत्नशील राहिलो आहे. मी मंचावर येतांना रविनाजींचे लोकप्रिय गाणे वाजवले गेले, अगदी त्याचप्रमाणे ये घुग्घूस शहर भी बड़ा है मस्त मस्त असा उल्लेख करत महीलाशक्तीच्या उत्साहपूर्ण व अभुतपुर्व गर्दीत साजरा होणारा हा दोन दिवसीय महोत्सव म्हणजे क्रिडा, संस्कृती व एकतेचा संगम आहे. आयोजकांचे उत्तम नियोजन व महिलाभगीनींचा सक्रिय सहभाग हेच या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे असे गौरवोद्गार आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना काढले.
महिलांनी स्वतःतील सामर्थ्य ओळखावे – अभिनेत्री रविना टंडन
अभिनेत्री रविना टंडन यांनी या शानदार कार्यक्रमात मला बोलावल्याबद्दल आमदार मुनगंटीवार यांचे आभारी असल्याचे सांगत हा कार्यक्रम म्हणजे महिला सक्षमीकरण, समानता आणि सांस्कृतिक वारसा यावर भर देणारा आहे. आदरणीय सुधीरभाऊ म्हणजे सेवेचे व्रत घेऊन काम करणारे नेते आहेत. त्यांच्या कामाचा आलेख सर्वांनाच प्रेरणा देतो. त्यांनी मला याठिकाणी बोलावून आमदार देवरावजी भोंगळे यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या सेवा केंद्राचे सेवाकार्य जाणून घेण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या महिलांच्या सामर्थ्यावर भाष्य करत त्यांनी सांगितले की, महिलांमध्ये स्वतःची क्षमता ओळखण्याची आणि ती वापरण्याची ताकद असते, ती क्षमता ओळखून महिलांनी आयुष्यात स्वतःला सिद्ध करावे असे त्या म्हणाल्या.
सुधीरजींच्या सेवा व सांस्कृतिक सर्जनशीलतेचे दर्शन घडविणारे व्यासपीठ म्हणजे घुग्घूसचे हे महिला महोत्सव! – सौ. सपना मुनगंटीवार
सुधीरजी मुनगंटीवार यांच्या नावाने होणारा आणि माझ्या लाडक्या नणंदबाईंना पर्वणी असलेला हा महोत्सव केवळ कला आणि संस्कृतीचा कार्यक्रम नाही, तर महिलांच्या सामर्थ्य, सृजनशीलता, आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनाचा एक प्रतीक आहे. आदरणीय सुधीरजीचे सेवाकार्य सबंध महाराष्ट्र जाणतो. त्यांच्या याच सेवाकार्याला पुढे नेण्याचे काम आमदार देवराव भोंगळे हे करत आहेत. सरपंच ते आमदार असा प्रेरणादायी प्रवास करणारे श्री. देवराव म्हणजे मुर्ती लहान पण किर्ती महान असे व्यक्तीमत्व आहेत. त्यांनी नेहमीच सुधीरजींच्या मार्गदर्शनात या भागात सेवेचे व्रत घेऊन काम केले आहे. महिलांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते मंच उपलब्ध करून देत आहेत हे निश्चितचं कौतुकास्पद आहे. त्यांच्या सेवाकार्याला तसेच या नेत्रदीपक महोत्सवाला माझ्याही भरपूर शुभेच्छा… असे शुभेच्छापर मनोगत आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्धांगिनी सौ. सपना मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला मंचावर आयोजक तथा आमदार देवराव भोंगळे, भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे,प्रयास सखी मंचच्या मार्गदर्शिका सौ. अर्चना भोंगळे,अध्यक्षा सौ.किरण बोढे, भाजपाचे विनोद चौधरी, गणेश कुटेमाटे,दिनेश बांगडे,सुनील बाम,चिन्नाजी नलभोगा,सुरेंद्र भोंगळे, हेमंत कुमार, हसन शेख, श्रीकांत सावे,विवेक (गुड्डू)तिवारी, शंकर सिद्दम,तुलसीदास ढवस, विनोद जंजर्ला, कोमल ठाकरे, संजय जोगी, गणेश राजूरकर, योगेश घोडके, मारोती मांढरे,विजय माथणकर, धनराज पारखी, प्रमोद भोस्कर,असगर खान, रवी घोडके, सौरभ घोडके, उमेश दडमल, रोशन अतकारे,सिनू कोत्तुर आदींची उपस्थिती होती.