प्रत्येक गाव शहरांतील गल्लो गल्लीत कवी
आमचे… गल्लो गल्लीत कवी,
आमचे… शहरो शहरी कव्वाल…
अन काय सांगू आता, आमच्यातलाच बवाल
आर्वी कोणी साहित्याचे रत्न, कोणी धम्माचे प्रचारक…
कोणी नेते समाजाचे, कोणी समाजाचे सेवक..!
कधी दिसलें नाही कुठ, आता त्यांना प्रत्येक आहे स्टेज…
पैसा, गाडी, बंगला म्हणून, आहे त्यांना आता क्रेज..!
गरीब तो कार्यकर्ता, त्यांची नाही घेत कोणी वार्ता…
जो भुकेला अर्ध्या पोटी, त्यालाच आहे चळवळीची चिंता…!
अक्षय खरं सांग.. आपण का आलोत माग..?
कल्याणाचा रस्ता दाखविणारा महान आहे तर
त्यावर दिसत का नाही आमची रांग…???
इथे शब्दांची रचना जरी माझी थोडी बरोबर नसणार…
पण भिमाचा अनुयायी माझ्या भावनेची कदर जरूर राखणार….!
__मार्शल अर्पित वाहाणे, महाराणा प्रताब वॉर्ड आर्वी ता. आर्वी जि. वर्धा