शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्याच्या फायद्यात वाढ होते ; कृषी अधिकारी पायघन यांचा शेतकऱ्यांना सल्ला!

0
45

शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्याच्या फायद्यात वाढ होते ; कृषी अधिकारी पायघन यांचा शेतकऱ्यांना सल्ला!


विरुर स्टेशन :- भारत हा कृषिप्रधान देश असून आपला शेतकरी राब-राब करुन वर्षभर सतत मेहनत करतो,पण शेतकऱ्याच्या मालाला भाव न मिळता अडतीला जास्त भाव मिळतो याचे उदाहरण म्हणजे अडते हमीभावापेक्षा शेतकऱ्यांचा माल कमी दरात खरेदी करून साठवणूक करुन ठेवतो,भाव वाढीच्या वेळी विकतो त्यामुळे “व्यापारी मजेत शेतकरी सजेत, म्हणून भरारी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपल्या सामान्य शेतकऱ्यांच्या फायद्यात वाढ होऊन सामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल व उत्पादनात वाढ होईल, तसेच सामूहिक शेती करून शेवगा लागवड यशस्वी करण्यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी कृषी विभाग राजुरा श्री.वि.बी पायघन यांनी केले.
राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन परिसरालगत येणाऱ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या धानोरा येथे शेतकरी उत्पादक कंपनी चा उद्घाटन सोहळा १० फेब्रुवारीला मोठ्या थाटामाटात पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक शेतकरी नेते माजी आमदार अँड वामनराव चटप, अध्यक्ष उपसरपंच घनश्याम दोरखंडे, तालुका कृषी अधिकारी कृषी विभाग राजुरा वि.बी पायगण, मंडळ कृषी अधिकारी चव्हाण, प्रतीभा गटकळ कृषी सहायक, सरपंच ज्योत्सना दुर्गे,पोलीस पा. कैलास चहारे, तंटामुक्त समिती अध्यक्ष मुरलीधर आमने,पुरोहित भिमटे,विशाल जिवतोडे, व शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल बोभाटे प्रास्ताविक जयराज दोरखंडे तर आभार प्रदर्शन स्वप्नील मोरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here