कंत्राटदारांच्या हुकूमशाही कडे CSTPS प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष -श्री. सुरज ठाकरे
चंद्रपूर:- सविस्तर वृत्त असे की, महा औष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर मधील पाईप कन्व्हेअर बेल्ट मध्ये काम करीत असलेल्या कामगारांना भावना एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आणि थायसन कंपनी चे कंत्राटदार हे कामगार कायद्याचे सरार्सपणे उल्लंघन करत कामगारांना २६ दिवस काम देण्याऐवजी फक्त २० दिवसाचेच काम देऊन सातत्याने कामगारांवर हुकूमशाही करत अन्याय करीत आहे. याशिवाय शासनाने ठरवलेला किमान वेतनुसार देखील या कामगारांना वेतन दिला जात नाही. हा अन्याय गेल्या २ वर्षा आधीपासून CSTPS येथील प्रशासन तथा कंत्राटदार हे जाणीवपूर्वक पाईप कन्व्हेअर बेल्ट मधील संपूर्ण कामगारांवर करीत आहेत. या गभीर समस्येचे निवारण करण्याकरिता जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष *श्री. सुरज ठाकरे* यांनी CSTPS तथा संबंधित प्रशासनाला वारंवार निवेदने देत सदर गंभीर बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर देखील अद्याप ही रास्त मागणी/ समस्या मार्गी लावण्यास CSTPS प्रशासन असमर्थ ठरले आहे.
परंतु जय भवानी कामगार संघटना हे कामगारांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोवर सातत्याने लढा लढत असल्याकारणाने संघटनेने संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी सातत्याने पत्रव्यवहार केल्यानंतर आज दिनांक- ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयांमध्ये सदर प्रकरणासंदर्भात आयुक्त साहेबांनी संघटनेसह CSTPS येथील अधिकारी वर्ग व कंत्राटदार यांच्या समक्ष कामगारांची बैठक आयोजित केली या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये आयुक्त साहेबांनी CSTPS येथील अधिकाऱ्यांना कामगार कायद्याचे सक्तीचे पालन करून कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. भविष्यात प्रशासनाकडून कामगार कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास जय भवानी कामगार संघटना कामगारांना न्याय देण्यास कटिबद्ध आहे असे यावेळेस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी ग्वाही दिली. सदर बैठकीमध्ये CSTPS येथील वरिष्ठ अधिकारी, श्री. सुरज ठाकरे यांच्या मार्गदर्शनात संघटनेचे सचिव राहुल चव्हान आणि कामगार अशोक गिलबिले, मारोती झाडे, गजु दुरटकर, तलिश जाधव, नितीन सावरकर आधी कामगार उपस्थित होते.