शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रालगतच्या पहाडात दडलंय काय ❓ गुप्त धन की आणखी काय ⁉️
⚫प्रा.आ.केंद्र शेणगाव येथे अवैध्य उत्खणन – वर्ग १ शासकीय अधिकारीच सांगतो गुप्त धनाची माहिती
⚫गुप्त धनासाठी हजारो ब्रास मुरुमाची रोज विक्री आणि गुप्त धण मिळाल्याची गावात खमंग चर्चा
⚫महसुल विभागाच्या मौका पंचनाम्यात 422 ब्रास मोक्यावर सापडले मात्र हजारो ब्रास ची अवैध्य विक्री
राजुरा– चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सुमारे महिनाभरापासून 10 ते 12 ट्रॅक्टर आणि जेसीबी JCB ने उच्च दर्जाचे मुरूम उत्खणन सुरू आहे, विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणी उत्खणन सुरू आहे ती जागा सुध्दा शासकीय असून प्राथमिक आरोग्य केंद्राची भव्य इमारत आहे, सदर प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव मध्ये करेवाड हे वैद्यकिय अधिकारी आहेत, वैद्यकिय अधिकारी करेवाड हे तेथील स्थानिक रहिवाशी असल्याने गुप्त धना बाबत प्रचलित नावाजलेले असल्याचे समजते, करेवाड हे वर्ग एक चे अधिकारी असून सुद्धा गुप्त धनाची माहिती देणे आणि खोदकाम त्यांच्या अधिकार क्षेत्रात येत असून सुध्दा प्रशासनाची कुठलीच परवानगी न घेताच खोदकाम सुरू करणे हे सगळे चित्र बगता अवैध्य गौण खनिज उत्खलनात त्यांच्या अधिकार क्षेत्रात अवैध्य गौण खनिजाचे उत्खलन झाल्याने त्यांच्याकडून दंड वसुल करण्याची मागणी गावात जोर धरली आहे. विशेष म्हणजे अवैध्य उत्खणाच्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर वन विभागाचा नाका सुध्दा आहे. असे असताना सुद्धा प्रशासन का काना- डोळा करीत आहेत याची चर्चा नाही केलेले बरे…
सदर अवैध्य उत्खणनाबाबत चौकशी केली असता प्रथम दर्शनी विश्वास न करण्या सारखी माहिती समोर आली ती म्हणजे चक्क अधिकारीच इथे गुप्त धन असल्याची माहिती दिल्याचे सूत्रान कळून समजले.
अधिकारीच जर गुप्त धनाला, अंधश्रध्देला चालना देत असेल तर सर्व सामान्य जनतेने काय करावे हे न सुटणारे कोडे आहे..
गावात सुरू असलेल्या चर्चेतील गुप्तधनासाठी अंधश्रध्देच्या बळी कोणी पडू नये हीच जागरूकता करण्यासाठी हे वृत्त असून प्रशासनाने कोणतेही अनुसूचित घटना घडू नये म्हणुन त्वरित चौकशी करून गावातील लोकांमधील अंधश्रद्धा दूर करावी