बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी कन्नड तालुका कार्यकारणी घोषित
अर्पित वाहाणे
वर्धा, ४ फेब्रू. :- बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. डॉ. सुरेश माने यांच्या आदेशाने व प्रदेश महासचिव अरविंद कांबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काल जिल्हा अध्यक्ष विजय शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कन्नड तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली.
विश्वजीत बागुल तालुका अध्यक्ष, साहेबराव गायकवाड तालुकाध्यक्ष कामगार आघाडी, शरद थोरात तालुका महासचिव, संजय धनेधर तालुका सचिव, भरत पवार अंधानेर सर्कल अध्यक्ष, भगवान देवरे शिरसगाव अध्यक्ष यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन तालुका, सर्कल, वार्ड अध्यक्ष महासचिव सचिव सर्कल अध्यक्ष या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. तसेच पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी साहेबराव दाभाडे दादा जिल्हा उपाध्यक्ष, तय्यब शहा सरपंच, महेंद्र साळवे, अर्जुन खरात, गोकुळ खुडे संदीप चव्हाण, बाळू नाथ साळवे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.