भोपाळ येथे दुसरी आशीयायी थाई किकबॉक्सिंग स्पर्धा संपन्न
मुंबई प्रतिनीधी : महेश कदम
भोपाळ येथे जानेवारी मध्ये दुसरी आशीयायी थाई किकबॉक्सिंग स्पर्धा संप्पन झाली. या स्पर्धेत भारत, श्रीलंका, नेपाळ, भूतान, बांगलादेश या देशातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत २२ सुवर्ण व ५ रजत पदके मिळवली. भारतीय संघातील मुंबईचे इनक्रेडिबल मार्शल आर्टस् चे खेळाडू श्री सुहास जगन्नाथ भोसले यांनी सिनियर गटात खेळत भारतासाठी सुवर्ण पदक मिळवले. भारतीय संघांचे प्रशिक्षक फरहान नबीजीं व संदीप बाळकृष्ण शिवतरकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच भारतीय कामगार सेना चे सहचिटणीस व शिवसेना नेते श्री निशिकांत शिंदे यांचे सहकार्य लाभले. तसेच सोबत गणेश गुरव आणि प्रितेश शिगवण हे सुद्धा होते. सुवर्ण पदक मिळवल्यानंतर दादर माहिम चे आमदार श्री. महेश सावंत ह्यांची भेट घेऊन प्रोत्साहन मिळवले.