पद्मशाली समाजाच्या वतीने महर्षी मार्कण्डेय ऋषी जन्मोत्सव उत्साहात साजरी
पद्मशाली समाजाच्या वतीने माजी सैनिक रोशन आत्राम च्या सत्कार
घुग्घुस येथील पद्मशाली सामाजिक बहुउद्देशीय संस्था तर्फे महर्षी मार्कण्डेय ऋषी जन्मोत्सव निमित्त पद्मशाली समाजाच्या वतीने माजी सैनिक रोशन आत्राम यांनी आपली देशसेवा करीत सेवानिवृत्ती झाले. त्याचे वडील रमेश आत्राम यांनी सैनिक होवुन देशसेवा करण्यात आले.
तसेच त्यांच्या मुलगा रोशन आत्राम सेवानिवृत्त होत त्यांनी पुर्ण वीस वर्षापैकी १२ वर्ष जम्मु मध्ये करुन कोबरा २०३ बटालियन येथे कार्यरत केले.
देशसेवा करुन आले सुरक्षित जवान रोशनजी रमेश आत्राम यांना पद्मशाली समाज बांधवाने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
तसेच आज दि.१ फेब्रुवारी २०२५ शनिवार रोज महर्षी मार्कण्डेय ऋषी जन्मोत्सवानिमित्ताने सर्व पद्मशाली समाज बांधवानी सकाळ पुजा अर्चना करण्यात आले.तसेच महाप्रसाद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले.तसेच सर्व परिसरातील सर्वधर्म समभाव समाजाने मोठ्या उत्साहात महाप्रसादाच्या लाभ घेण्यात आले.
त्याच बरोबर सामाजीक जेष्ठ कार्यकर्ता शेखर तंगलापेल्ली, सुरज कन्नूर व बरेच राजकीय पक्षाचे नेत्यांच्या पण समाजातर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष श्री.मा.श्रीनिवास गुडला, उपाध्यक्ष शंकर कटकुरवार,सचिव राहुल पप्पुलवार,सहसचिव दिलीप कुडकालवार, कोषाध्यक्ष श्रीरामलु मामिडाला, सहकोषाध्यक्ष राजु चिप्पावार, मार्गदर्शक प्रभाकर येनगंदलवार, महिला अध्यक्ष सौ.सुषमा चिप्पावार, उपाध्यक्ष सौ. वंदना मुळेवार, सौ.किरण अनमलवार,सचिव सौ.विजया गुडला,सौ.पुनम बंडीवार,कोषाध्यक्ष सौ. रमादेवी येनगंदलवार, सहकोषाध्यक्ष सौ.किरण कटकुरवार,सदस्य अनिल मंत्रिवार, प्रकाश देशसेट्टीवार,अशोक गोटुकवार,श्रीनिवास ताला, सत्यनारायण अंदेवार,पोल राजेशम व आदी सदस्य गण उपस्थित होते.