संघरामगीरी भूमीला लाखो धम्म बांधवानी केले वंदन…

0
12

संघरामगीरी भूमीला लाखो धम्म बांधवानी केले वंदन…

महामानवाचा जयघोष : अवतरली निळी पाखरे

 

चिमूर/आशिष गजभिये
अस्पृश्यता लादलेल्या समाजाला अंधकारातून युगप्रवर्तकाने द्यानाच्या प्रकाशात आणले.३१ जानेवारी १९२० रोजी बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे मुखपत्र काढून
मुक्तीच्या संग्रमाची सुरुवात केली होती. मागील ३० वर्षांपासून तपोभूमी येथे या धम्म समारोहाचे आयोजन केल्या जाते. या धम्म स्मारोहाचे साक्षीदार होण्यासाठी भारतभरातील लाखो निळ्या पाखरांनी शुक्रवारी या भूमीत येवून वंदन केले.

सम्राट अशोकाच्या काळापासून बुद्ध भिख्खू व उपासक – उपासिकांच साधना व अधिष्ठान करण्याची भूमी अशी ओळख असलेल्या साधनाभुमित मागील ३० वर्षापसून महाराष्ट्र उपासक – उपसिका संघाच्या वतीने आयोजित केला जात असलेला दोन दिवसाच्या देशाच्या कानकोपऱ्यातून धम्म बांधवांचे थवे दाखल झाले होते.

गुरुवारी दिवसभर विविध कार्यक्रम व रात्री महापरित्रान पाठ व विविध कार्यक्रम व रात्री महापरित्रण करीता कडाक्याच्या थंडीतही धम्म बांधवांची लक्षणीय उपस्थिती होती.
महास्थविर द्यानजोती यांनी उपशिकाना देशजा दिली. या प्रसंगी भंते डा. धम्मचेती व अखील भारतीय भिख्खू संघ उपस्थित होते. शुक्रवारी समारोपीय कार्यक्रमात अस्पृश्यता मुक्ती लढ्याचे बिगुल फुकनाऱ्या बाबबासाहेबांच्या अजरामर कार्याचा व इतिहासाचे स्मरण भावी पिढीला करून देण्यासाठी सम्यक क्रांतीच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला.

 

धम्म चळवळ गतिमान करा – भदंत ज्ञानज्योती
डॉ. बाबासाहेबांनी दीक्षाभूमीवरील धम्मदीक्षा समारोहात अनुयायांना संबोधित करताना बुद्धमय भारत निर्माण करण्याचे स्वप्न बघितले होते. व अनुयायांना संदेश दिला होता. त्याच स्वप्नपूर्ती साठी तुमची जबाबदारी व समाजाप्रती असलेली जाणीव ओळखून धम्म चलवळ गतिमान करा.

विपश्यनेतून मानवी जीवनाचे कल्याण – भदंत डॉ. धम्मचेती
समस्त मानव जातीचे कल्याण भगवान बुधाच्या धम्म आचानारतून होते. त्रिषरण, पंचशील अंगिकारून एक आदर्श व्यक्तिमत्व निर्माण होते. तथागतांच्या प्रणालिनुसार आपल्या स्वतः वर नियत्रंण मिळवता येत असून अनुयायांनी विपष्यानेत सहभागी व्हावे. कारण मानवी जीवनाचे कल्याण करणारी विपश्यना ही महत्वाची कार्यप्रणाली आहे.

संघरामगिरीचा प्रश्न लोकसभेत मांडणार – खा. चंद्रशेखर आझाद
संघरामगीरी ही पावन भूमी आहे. यात मागील ३० वर्षापासून भिख्खू संघ बाबासाहेबाना नमन करतो. महाराष्ट्र राज्यातील संघारामगीरी, चैत्यभूमी, दीक्षाभूमी हे सर्व विषय संसदेच्या पटलावर मांडणार व संघरामगिरीला पायाभूत सुविधा नक्कीच मिळवून देणार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here