ओबीसी विद्यार्थ्यांचा मागील पाच महिन्यांपासून प्रलंबित मासिक निर्वाह व भोजन भत्ता घ्या!

0
75

ओबीसी विद्यार्थ्यांचा मागील पाच महिन्यांपासून प्रलंबित मासिक निर्वाह व भोजन भत्ता घ्या!

आमदार देवराव भोंगळे यांची बहुजन कल्याण मंत्री ना. अतुल सावेंकडे मागणी

 

राजुरा, दि. ३१
ओबीसी आणि भटके विमुक्तांसाठी राज्य सरकारने ५२ वसतिगृहे सुरू केली परंतू मागील पाच महिन्यांपासून या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक निर्वाह व भोजन भत्ता आणि शैक्षणिक साहित्यांसाठीचा खर्च मिळाला नसल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष घालून विद्यार्थ्यांचा मासिक निर्वाह व भोजन भत्ता डीबीटीद्वारे जमा करावा अशी मागणी राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री ना. अतुलजी सावे यांना भ्रमणध्वनी करून केली.

ओबीसी, व्हीजेएनटी मुला-मुलींना शहरात उच्च शिक्षणासाठी वसतिगृहाची सोय नसल्याने भाड्याने खोली घेऊन राहावे लागत होते, अशावेळी त्यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृहे निर्माण करण्याचा सकारात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला आणि ऑगस्ट-सप्टेंबर २०२४ पासून ओबीसी मुला-मुलींसाठी राज्यात ५२ वसतिगृह सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांना दैनंदिन उपयोगाच्या खर्चासाठी मासिक ८०० रुपये निर्वाह भत्ता आणि खानावळीसाठी ४२०० रुपये भोजन भत्ता देण्याचे ठरले. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम दर महिन्यात जमा होणे अपेक्षितही होते. परंतु सदर रक्कम मागील पाच महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने या गंभीर विषयाकडे लक्ष घालून ओबीसी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रलंबित मासिक निर्वाह व भोजन भत्ता तातडीने द्यावा. अशी मागणी आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी भ्रमणध्वनी करून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here