काँग्रेस कार्यलयात ” शहीद दिन साजरा”
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना काँग्रेस तर्फे आदरांजली अर्पित
घुग्घूस : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 30 जानेवारी 1948 रोजी नाथुराम गोडसे यांच्या द्वारे दिल्ली येथील बिडला हाऊस येथे गोळी मारून हत्या केली.
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त 30 जानेवारी हा दिवस देशात शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. सत्य अहिंसा आणि सर्वधर्म समभावांचे विचार देशाला सदैव मार्गदर्शीत करीत आहे.
आज 30 जनवरी रोजी घुग्घूस शहर काँग्रेस कार्यलयात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. आदरांजली अर्पित करण्यात आली.
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका सचिव विशाल मादर, कुमार रुद्रारप, दिपक पेंदोर, अभिषेक सपडी, राजेंद्र पाटील, कपिल गोगला, शहशाह शेख, अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.