गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत तडजोड करणार नाही ग्रामपंचायत प्रशासन
अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार
तालुका प्रतिनिधी
चिमूर
नेरी येथील पिएचसी चौकातील अतिक्रमण हटवून ग्रामपंचायत प्रशासन स्तब्ध बसणार नसून नेरी येथील बाजार चौकातील अतिक्रमण हटविणार असून अनेक ठिकाणी असलेले अतिक्रमण हटविणार आहे. विकासाला चालना देण्यासाठी तसेच गावातील रस्ते नाल्या यांचा विकास करण्यासाठी रस्त्यावर आलेले आणि व्यवसायिकांनी रस्त्यावर आणलेले अतिक्रमण हटविणार असून अतिक्रमणाबाबत कुठलीही तडजोड करणार नसल्याचे ग्रा प प्रशासनाने सांगितले आहे.
मागील कित्येक दिवसांपासून नेरी गाव अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून अनेकांनी अतिक्रमण केले असून यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, वाहतुकीच्या समस्या मोठ्या प्रकामांत पाहाव्या लागत आहे . त्याच सोबत नवीन बांधकाम किंवा विकासासाठी अडथळे निर्माण झाले असून एकाच व्यक्ती कडे दोनदोन दुकान गाळे आहेत यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्व समस्यांना कायदेशीर कारवाई करून अतिक्रमण हटविणार असल्याचे ग्रा प प्रशासनाने माहिती दिली असून याबाबतीत कुठलीही तडजोड केली जाणार नाही असे प्रस्तुत प्रतिनिधी बोलताना सांगितले आहे.