गुरुजनांचे मार्गदर्शन व सातत्यपूर्ण अभ्यास हेच यशाचे कानमंत्र – ऍड. अनंता रामटेके
भिवाजी वरभे विद्यालय व महाविद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम
तालुका प्रतिनिधी
चिमूर
ग्रामीण भागातील विद्यार्थी क्रीडा- सांस्कृतिक व अभ्यास या प्रकारच्या सर्व स्पर्धात अव्हल असतो फक्त याला अपवाद त्याच्यामनातील नुण्यगंड ठरतो,हा स्वतःच्या मनातून नाहीसा करून शिक्षकांचे मार्गदर्शन आत्मसात करून अभ्यासात सात्यतता कायम ठेवल्यास यश नक्की पदरी पडतेच असे प्रतिपादन नागपूर उच्च न्यायालयाचे अधिवक्ता ऍड.अनंता रामटेके यांनी केले.
ते चिमूर तालुक्यातील स्व.भिवाजी वरभे विद्यालय व महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण सोहळ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या प्रसंगी मंचकावर अध्यक्ष स्थानी कु. बालपांडे,प्रमुख अतिथी नरेंद्र विखार, पिसे उपस्थित होते. पुढे बोलताना ऍड.रामटेके यांनी स्पर्धा परीक्षा व त्यात करावा लागणारा संघर्ष व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संधी विद्यार्थ्यांना सांगितल्या व शाळेचा माझी विद्यार्थी म्हणून सदोदित मार्गदर्शन करण्याचं आश्वासन दिलं.
उपस्थित मान्यवरांनी पण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्यांनाu ऍड.रामटेके यांचे हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र वाटप करण्यात आले.या वेळी माझी विद्यार्थी म्हणून ऍड.रामटेके यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे संचालन शिक्षक संजय वरभे तर आभार सहायक शिक्षक लीपटे यांनी मानले.