लाॅयड्स मेटल व लाॅयड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या सौजण्याने नाना नाणी पार्क चंद्रपूरकरांसाठी नवीन आनंदाचे ठिकाण!
चंद्रपूर शहरात एक नवीन आकर्षण जोडले गेले आहे. लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड आणि लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या सौजण्याने पार्क 8 हेक्टर मध्ये लॉयड्स नाना नाणी पार्क उभारण्यात आले क्षेत्रात विस्तीर्ण वृक्षारोपण ज्यामध्ये मियावाकी रोपे ३६००,बांबू ४५,
वड ४५,बेल ११००, निम११०० स्मृती वन २२ ,रक्तचंदन २०,पिपळ २० कुसुम २०,रोहन २०,मोहगणी २०,चिरोल २०, रिठा २०,अंजन २० ,सिसम २०,पुत्रजीवा २०तिवस २० जांभूळ वन,आमराई वन, तुळशी वन,औषधी झाडे, पंचायत वन,अमृत वन आणि दुर्मिळ प्रजाती वृक्ष संवर्धन तसेच अनेक फुलझाडे व फळझाडे लागवड करण्यात पार्क जल संवर्धन करिता तलाव करण्यात आले आणि वृद्धांसाठी बसण्याच्या जागा,योगा क्षेत्र आणि हिरवीगार बाग इ.सुविधा उपलब्ध आहेत.
लॉयड्स नाना नाणी पार्कचे दिनांक २६ जानेवारी २०२५ रविवार रोजी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर ना.श्री.अशोक उईके यांच्या हस्ते उद्घाटित करण्यात आले.
या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून श्री.आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर ना.श्री.अशोक उईके तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.माजी वन मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार,मा.विनय गौडा जिल्हाधिकारी चंद्रपूर,मा.मधुर गुप्ता साहेब कार्यकारी संचालक लॉयडस मेटल अँड एनर्जी लिमिटेड मा. विवेक जॉन्सन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर , सौ. तुलसी मधुर गुप्ता ,श्री. वाय.जी.एस. प्रसाद युनिट हेड,मा. प्रशांत पुरी साहेब वरिष्ठ उपाध्यक्ष, पुलक गोयल, महाप्रबंधक,श्री.रवी शुक्ला लॉयडस मेटल अँड एनर्जी लिमिटेड वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्यात मंत्री श्री.उईके म्हणाले,”या पार्कमुळे चंद्रपूर शहराचे सौंदर्य वाढले आहे आणि नागरिकांना एक सुंदर आणि शांत वातावरण मिळाले आहे.” त्यांनी लॉयड्स कंपनीच्या या पुढाकाराचे कौतुक केले.
या पार्कमुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांना,विशेषतः वृद्धांना आणि मुलांना एक सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण मिळाले आहे.हा पार्क नागरिकांसाठी मनोरंजन आणि विश्रांतीचे एक आदर्श ठिकाण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रम प्रसंगी बोलताना श्री.मधुर गुप्ता यांनी शासनाच्या विविध योजनेत आम्ही सहभागी असून भविष्यात हरित चंद्रपूर घडविण्यासाठी आम्ही मोठे योगदान देऊ व चंद्रपूर चा विकास करू असे आश्वासन दिले.
नाना नानी पार्क यशस्वी पने पुढे घेऊन जाण्यासाठी प्रशांत खाडे व श्री.तरुण केशवाणी यांनी अथक परिश्रम घेतले.तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वन विभाग व लॉयडस इंफिनाइट फाउंडेशन यांचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.