सरस्वती विद्यामंदिर नकोडा येथे सांस्कृतिक कार्यक्रम व भूमिपूजन
घुग्घुस :- दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी नकोडा येथील सरस्वती विद्यामंदिर शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सव व भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष माननीय श्री रमेशचंद्र बागला सर होते. नकोडा येथील सरपंच मा.श्री.किरण बांदुरकरजी आणि इतर प्रमुख पाहुणे सुद्धा या प्रसंगी उपस्थित होते.
या शाळेच्या सुशोभीकरणासाठी माननीय श्री किशोर भाऊ जोरगेवार, आमदार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांनी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीच्या मदतीने शाळेच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. कार्यक्रमाचे भूमिपूजन संस्थापक माननीय श्री रमेशचंद्र बागला सर यांच्या हस्ते पार पडले.
शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ पल्लवी वाढई मॅडम यांनी आमदार श्री.किशोरभाऊ जोरगेवार यांचे दिलेल्या निधीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
तसेच यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडी अध्यक्ष सौ.उषाताई आगदारी यांच्या सहकार्याबद्दल सुद्धा आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गौरव उगे सर यांनी केले,तर आभार श्री. सुरेश डिकोंडा सर यांनी पार पाडले. याशिवाय शाळेतील शिक्षक-संस्थेतील कर्मचारी सौ. निमजे मॅडम, दुधगवळी सर,मडावी सर, उरकुडे सर,खामनकर सर,टोंगे मॅडम,रोहिदास मॅडम आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महत्त्वाचे सहकार्य दिले.
संपूर्ण कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला, ज्यामुळे शाळेच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले.