घुग्घुसचे ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र भाजपा सदस्यता नोंदणीत आघाडीवर
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र पाठवून केले विवेक बोढे यांचे अभिनंदन
घुग्घुस : येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राने भाजपा सदस्यता नोंदणीत आघाडी घेतली आहे. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत ३, ८१६ भाजपाच्या सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे अशी माहिती भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी दिली आहे.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी ७१ चंद्रपूर विधानसभा (ग्रामीण) मधून प्रथम १,००० सदस्यांची नोंदणी केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र पाठवून भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचे अभिनंदन केले आहे.
घुग्घुस शहरात भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या नेतृत्वात भाजपा सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आले असून त्याला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या नेतृत्वात आयोजित सदस्यता नोंदणीचे महाअभियान ५ जानेवारीपासून ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातून रॅलीद्वारे सुरु करण्यात आले होते.