डॉ. दीपक दडमल यांचा सत्कार
मिंनझरी येथील नागदिवाळी कार्यक्रम
चिमूर/तालुका प्रतिनिधी
माना समाज बांधवाच्या वतीने चिमूर तालुक्यातील मिनझरी येथे नागदिवाळी उत्सव साजरा करण्यात आला. तेव्हा समाजातील समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला. त्यात खडसंगी व परिसरात वैधकीय व्यवसाय करून समाजसेवा करणारे डॉ दिपक दडमल यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पुरुषोत्तम रंदये, प्रकाश दडमल, रोशन खोब्रागडे, उषाताई धाडसे सह आदी उपस्थित होते.