श्रीलंका,मलेशिया नंतर सहज सुचलच्या प्रख्यात कवयित्रि अर्चना सुतारला(WHO) जागतिक आरोग्य संघटनेचा आंतरराष्ट्रीय “कोरोना योद्धा” पुरस्कार बहाल !

0
1127

श्रीलंका,मलेशिया नंतर सहज सुचलच्या प्रख्यात कवयित्रि अर्चना सुतारला(WHO) जागतिक आरोग्य संघटनेचा आंतरराष्ट्रीय “कोरोना योद्धा” पुरस्कार बहाल !

अनेक देशांतुन हाेताेयं अर्चनावर अभिनंदनाचा वर्षाव ! 

किरण घाटे 
सातारा जिल्ह्यातील पाचवड तालुक्यात अंतर्गत येत असलेल्या वाई तालुक्यातील सुप्रसिध्द कवियत्री अर्चना दिलीप सुतार ह्या एक शिक्षिका तदवतचं समाजसुधारिका म्हणून भारताच नव्हे तर परदेशात देखिल सर्वत्र परिचित व प्रसिध्दीच्या झाेतात असताना त्यांना(WHO)अर्थातच जागतिक आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय कोरोना योद्धा पुरस्कार व विशेष सन्मानपत्र देवून गौरविले आहे. जगभरात पसरलेल्या महाभयानक तथा प्राणघातक कोरोना संकट काळात विविध प्रकारच्या स्वरचित कवितांच्या माध्यमांतुन कोरोना जनजाग्रूतीचे महान व पवित्र कार्य कु .अर्चना सुतार यांनी सातत्याने केले आहे . आज ही त्यांचे हे महान कार्य नित्यक्रमाने सुरु असल्याचे दिसुन येते .दरम्यान त्यांना आता पावेताे भारतातील व परदेशातील नामवंत तथा अग्रगण्य विविध संस्था व संघटनांनी (121) कोरोना योद्धा पुरस्कार देवून सन्मानित केले आहे. विशेष उल्लेखनिय बाब अशी हे सन्मान तथा पुरस्कार मिळत असतानाच जागतिक पातळीवर सर्व देश मिळून कार्यरत असणां-या शासकीय संघटना म्हणजेच “वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन” ! या ही जागतिक आरोग्य संघटना)चा (covid-19) कोविंड योद्धा पुरस्कार नुकताच अर्चना सुतार यांना प्राप्त झाला आहे एकंदरीत त्यांच्या जागतिक महान व पवित्र कार्याची दखल उपरोक्त संघटनेने घेतली आहे .हे तेवढेच खरे आहे ! अर्चनाच्या या उल्लेखनिय कामगिरीचे तथा अनेक पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल देशभरातुन त्यांचे वर सातत्याने अभिनंदनांचा वर्षाव हाेत आहे .दरम्यान महाराष्ट्रातील लोकप्रिय सहज सुचलच्या मुख्य संयाेजिका तथा जेष्ठ लेखिका अधिवक्ता मेघा धाेटे , सहसंयाेजिका मायाताई काेसरे , प्रभा अगडे , ज्योति मेहरकुरे , कविता चाफले , प्रांजली दुधे , सराेज हिवरे व जास्मिन शेख यांनी कवयित्रि अर्चना सुतारचे ताेंडभरुन काैतुक केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here