आदिवासी समाजाने आपल्या संविधानिक हक्क व अधिकाराबाबत जागरूक होण्याची गरज : ऍड. अनंता रामटेके

0
57

आदिवासी समाजाने आपल्या संविधानिक हक्क व अधिकाराबाबत जागरूक होण्याची गरज : ऍड. अनंता रामटेके

खानगाव येथील नागदिवाळी महोत्सव व गुणवंताचा सत्कार

 

चिमूर/तालुका प्रतिनिधी
खानगाव येथे दोन दिवसीय नागदिवाडी महोत्सव कार्यक्रम पार पडला , या कार्यक्रमाचे आयोजन माना आदिम जमात मंडळ मुंबई शाखा खानगाव च्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन विजयकुमार घरत यांनी केले, सुधाकर जी चौखे प्रा.डॉ. दिनकर चौधरी मार्गदर्शक, गुरुदेव नन्नावरे अध्यक्ष तर ऍड. अनंता रामटेके मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम विषयी मार्गदर्शन करताना आदिवासी समाजाने आपल्या संविधानिक हक्क व अधिकारा बाबत जागरूक राहावे, उच्च शिक्षण व आरक्षणाच्या माध्यमातून आपला विकास करावा, आदिवासींना त्यांचे अधिकार व न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवरावजी कारमेंगे तर संचालन रवी चौखे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here