सिडीसीसी बैंक विरोधात सुरु असलेल्या आमरण उपोषणाला आमदार भोंगळे यांची भेट

0
9

सिडीसीसी बैंक विरोधात सुरु असलेल्या आमरण उपोषणाला आमदार भोंगळे यांची भेट

उपोषणकर्ते मनोज पोतराजे यांची प्रकृती बिघडली, अनेक सामाजिक संघटनाच्या पदाधिकारी यांनी दिला पाठिंबा

 

चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नोकर भरती परीक्षेतील झालेला घोळ आणि आरक्षण डावलून खुल्या प्रवर्गात भरती प्रक्रिया राबविल्याने आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती द्वारे मागील 2 जानेवारी पासून साखळी ठिय्या आंदोलन व त्यानंतर 16 जानेवारी पासून मनोज पोतराजे यांनी सिडीसीसी बैंकेच्या विरोधात सुरु केलेल्या आमरण उपोषणाला अनेक सामाजिक राजकीय संघटनाचा पाठिंबा मिळतं असून आज दिनांक 19 जानेवारीला दुपारी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळॆ यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्याची भूमिका समजून घेतली, यावेळी उपोषण कर्ते मनोज पोतराजे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि आपले आंदोलन हे योग्य मागणी करिता असून मी शासनाकडे याबाबत पाठपुरावा करेल अशी ग्वाही दिली.

सिडीसीसी बैंकेच्या भ्रष्ट आणि बेकायदेशीर नोकर भरतीच्या विरोधात सुरु असलेले आंदोलन निश्चितपणे योग्य आहे, मी स्वतः राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ, पंकज भोयर यांच्याशी भेट घेऊन शासनास या नोकर भर्तीवर त्वरित निर्णय घ्यायला लावून भ्रष्ट मार्गाने होत असलेली नोकर भरती रद्द करण्यास शासनास भाग पाडू असा विश्वास आमदार देवराव भोंगळे यांनी दिला, त्यांनी सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरती परीक्षेत झालेल्या घोळ आणि विद्यार्थ्यांनी विडिओ बनवून सामाजिक माध्यमावर टाकल्याने औचित्याचा विषय विधानसभा सभागृहात मी उचलला व सरकार च्या ही बाब लक्षात आणून दिली याचाही उल्लेख आमदार देवराव भोंगळे यांनी यावेळी केला, यावेळी आरक्षण बचाव संघर्ष समितीचे समन्वयक राजू कुकडे, संजय कन्नावार, महेश वासलवार, सुनील गुढे, अनुप यादव, आशिष ताजने, राजू बिट्टूलवार, अमन अंदेवार, सुरेश श्रीवासकर, मनोज तांबेकर, इत्यादीची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here