लाॅयड्स इंफिनाईट फाउंडेशन द्वारा महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित
दि.१७ जानेवारी २०२५ शुक्रवार रोजी लाॅयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड आणि लाॅयड्स इंफिनाइट फाउंडेशनच्या महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत उसगांव येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आले.
महिला सक्षमीकरण कार्यक्रमांचा उद्देश महिलांच्या विकासाला चालना देणे हा आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या बळकट केले जाते.
कार्यशाळेने ग्रामीण महिलांना सक्षम बनविण्याचा मार्ग प्रशस्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या उसगावच्या सरपंच सौ. निविताताई ठाकरे यांनी महिलांना स्वावलंबी बनण्याचे आवाहन केले. तर कार्यशाळा उदघाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या जिल्हा परिषद चंद्रपूरच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी सौ.अश्विनी केळकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिक्षण आणि कौशल्य विकासाचे महत्त्व विशद केले सवांद साधताना महिलांना ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात पुढे येऊन विकास करावा या सोबतच मुलांच्या शिक्षनाकडे अधिक लक्ष घालावे सर्व सामान्य महिला सुद्धा मोठं कार्य करू शकतात राईबाई सारखी सीड मदर होऊ शकतात.
कौशल्य विकासासाठी अभ्यास दौरे आयोजित करण्यासाठी लॉयड्सनी महिलांना मदत करावी. कार्यक्रमात विस्तार अधिकारी शुभांगी पिदूरकर यांनी सोप्या पद्धतीने मुलांचा अभ्यास कसा करवून घ्यावा या बाबत मार्गदर्शन केले.उज्वला जोगी मॅडम ,श्री.दीपक साळवे,अनिल आवळे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
या कार्यशाळेत महिलांना आरोग्य, शिक्षण,शेती,बँकिंग,बचत आणि गुंतवणूक या विषयांवर मार्गदर्शन देण्यात आले. ग्रामीण महिलांच्या समस्या आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत विस्तृत चर्चा झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्ये श्री. दीपक साळवे यांनी लॉयड्स इंफिनाईट फाउंडेशन गावाच्या सर्वांगीन विकासासाठी कटीबद्ध असून शेती,आरोग्य,शिक्षण,ग्रामीण पायाभूत सुविधा विकास, जलसंधारण अश्या प्रकल्पबाबत माहिती दिली.
तर सूत्र संचालन लता बावणे आणि आभार मंजुषा वडस्कर यांनी मानले.
लॉयड्सच्या या पुढाकाराचे महिलांनी भरपूर कौतुक केले. त्यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन अधिकाधिक प्रमाणात होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुराग मत्ते, संस्कार चोरगे, स्नेहा घाटे, काजल चुने,रमण पाहनपटे,अश्विनी खोब्रागडे, प्रिया पिंपळकर,मनीषा बरडे आणि ममता मोरे यांनी परिश्रम घेतले.