बालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा – डॉ. दीपक दडमल
बाल संस्कार कॉन्व्हेन्ट सांस्कृतिक कार्यक्रम
तालुका प्रतिनिधी
चिमूर
बालकांच्या बालपणातच त्यांच्या अंगातील सुप्त गुण पालक व शिक्षकांना कळत असतात त्याच्या अंगात असलेले सुप्त गुण हेरण्याची वेळ हीच बालपण असते त्या नुसारच त्यांचं वैशिष्ठ ठरवून त्यांचे पालक त्यांचं भविष्य कोणत्या क्षेत्रात आहे हे जाणून त्यांची समोरील वाटचाल निश्चित करीत असतात त्या साठी त्यांच्या सुप्त गुणांना व्हावं मिळणारे कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक असते.असे प्रतिपादन डा.दीपक दडमल यांनी केले.
ते खडसंगी येथील वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्तिथीनिमित्त बाल संस्कार कॉन्व्हेन्ट सांस्कृतिक कार्यक्रमात बोलत होते.या प्रसंगी डा.लोकेश वासनिक,सरपंच प्रियंका कोलते,शिवकुमार कारमेंगे,रामराव मटाले,पालक प्रतिनिधी अस्विस्नी सहारे,मधुकर झिले, मुसळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डा.दीपक दडमल यांनी ग्वाही दिली की,जस दरवर्षी तुकडोजी महाराज पुणयतिथीनिमित्त गुरुदेव सेवा मंडळ बालकांच्या सुप्त गुणांना व्हावं देण्यासाठी मंचक उपलब्ध करून देतो त्याच प्रमाणे नेहमी हा उपक्रम आयोजित करण्यात येणार व उत्साह म्हणून यात आणखी नावीन्यपूर्ण भर देण्यात येणार.
या कार्यक्रमास हजारो संख्येने ग्रामस्थ,पालक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन हरीकृष्न कामडि यांनी तर आभार बाल संस्कार कॉन्व्हेन्ट च्या पूजा शिवरकर यांनी मानले.