नांदा येथे विदर्भ स्तरीय भजन स्पर्धा

0
103

नांदा येथे विदर्भ स्तरीय भजन स्पर्धा

 

नांदा :- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५६ वी पुण्यतिथी व वैराग्यमूर्ती कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा याच्या ६८ व्या स्मृतिदिन निमित्य कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी नांदा येथे गुरुदेव सेवा मडळ व ग्रामवासिय नांदा यांच्याद्वारे विदर्भ स्तरीय पुरुष महिला व बाल भव्य खंजरी भजन स्पर्धेचे दि. १७ शुक्रवार ,१८ शनिवार , व १९ रविवार, जानेवारी या तीन दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे.

यात पुरुष गटाकरिता प्रवेश रोख स्वरूपात ९ बक्षिसे असून प्रथम बक्षीस १२ हजार रुपये आहे. महिला गट रोख स्वरूपाचे ७ बक्षीसे असून १० हजार पहिले बक्षीस आहे तर बाल गटात करीता ५ बक्षीसे असून ७ हजार पहिले बक्षीस ठेवण्यात आले आहे. किर्तन, भजन पालखी सोहळ्याचे सुद्धा आयोजन केले आहे. जास्तीत जास्त भजन मंडळी व गुरुदेव भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन गुरुदेव सेवा मंडळा तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here