रखडलेल्या रस्त्याचे बांधकाम त्वरित करा
नगरपरिषद मुख्याधिकारी मुल यांना उलगुलान संघटनेचे निवेदन
विर सावरकर वार्ड क्रमांक १२ व ५ लोहकरे च्या घरापासून तर गुरुनानी च्या घरापर्यंत नाली बांधकाम मंजूर झाले होते परंतु पुल्लावार यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम झाले. परंतु त्यापुढील गुरुनाणी यांच्या घरापर्यंतचे नालीचे व रस्त्याचे बांधकाम अपूर्णच आहे. कित्येक वर्षापासून सदर रस्त्याचे व नालीचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे येथील जनतेला मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच दशमवार यांच्या घरापासून ते बल्लावार यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याची व नालीचे बांधकाम सुद्धा अपूर्णच आहे. यामुळे येथीलही नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. करिता सदर दोन्ही रस्त्याचे व नालीचे बांधकाम मंजूर झाले असून याचे अंदाजपत्र तयार झाले असून रोडचे काम अडून आहे. तरी रस्त्याचे व नालीचे काम तात्काळ करण्यात यावे करिता उलगुलान संघटना शाखा मूल द्वारा मुख्य कार्यकारी अधिकारी मूल यांना निवेदन देण्यात आले.
सदर बांधकाम तात्काळ लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात यावा अन्यथा उलगुलान संघटना येथील नागरिकांना घेऊन आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणारन व काही अनुचित प्रकार घडला तर याला संबंधित प्रशासन जबाबदार राहणार असा इशारा संबंधित प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदन देताना उलगुलान संघटनेचे शाखा अध्यक्ष निखिल वाढई, प्रणित पाल, आकाश येसनकर, सुजित खोब्रागडे, रोहित शेंडे, अक्षय दुमावार तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.