आ. जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांची जयंती साजरी
घुग्घुस येथील मा.आमदार किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊसाहेब भोंसले यांची जयंती साजरी करण्यात आले.
यावेळी सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पूजन करून सामुहिक पुष्पहार अर्पण करण्यात आले.
आ.किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनातून भाजप पक्षाचे मान्यवरांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याविषयी मनोगत प्रभावीरित्या व्यक्त केले. आई हिच जगातील सर्वात मोठा गुरु व योद्धा असते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ होत्या. त्यांच्या संस्कारामुळे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यासारखे महान राजे घडले, यासंबंधी मनोगत व्यक्त केले.त्याचबरोबर स्वामी विवेकानंद हे तरुणांचे आदर्श आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा यासंबंधी मनोगत व्यक्त केले. दोन्ही महान व्यक्तिमत्व आपल्यासाठी आदर्श आहेत. त्यांच्या कार्याचा, संस्काराचा आदर्श समोर ठेवून आपण सर्व कार्य करुया,मान्यवरांनी यासंबंधी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी माजी.उपसरपंच संजय तिवारी,इमरान खान, मुन्ना लोडे,तुळशीदास ढवस,राजेंद्र लुटे,विठ्ठल डुडुले,माजी ग्रामपंचायत सदस्य पुजाताई दुर्गम,वैशालीताई ढवस,सुचिता लुटे,सागर बुरेवार,नवीन मोरे,विजय सिंग, सुमित ठाकरे,सुनिता पाटिल, सारीका भोंगळे, संगिता सांगले, आशा भंडारकर, सुनिता घिवे,जयश्री राजुरकर, वंदना नागवंशी व आदी उपस्थित होते.