उद्या फुलणार तपोभूमीवर गुरुदेव भक्तांचा महासागर
अनेक कार्यक्रमांनी तपोभूमी भक्तिमय झाली
विविध कार्यक्रमांचे आयोजन करून उद्या गोपाळकाला आणि मार्गदर्शनानी होणार सांगता
अनेक मान्यवरांची उद्या गोपाल काल्याला राहणार हजेरी
आशिष गजभिये / चिमूर
विदर्भाची पंढरी समजली जाणारी आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमीत मागील ९ जाने पासून गुंफा यात्रा महोत्सव अनेक विविध कार्यक्रमांनी सुरू असून हजारो गुरुदेव भक्तांच्या उपस्थित संपन्न होणार आहे उद्या या यात्रा महोत्सवाचे गोपाळकाला व मान्यवरांच्या मार्गदर्शनाने सांगता होणार आहे आणि तपोभूमितील राष्ट्रसंताचे दर्शन घेण्यासाठी गुरुदेव भक्त भाविकांचा महासागर उसळणार आहे
अनेक कार्यक्रमांनी तपोभूमी भक्तिमय झाली असून गोपाळकाला ह भ प लक्ष्मणदास काळे महाराज अमरावती यांच्या हस्ते होणार आहे यानंतर मार्गदर्शन कार्यक्रमाला सुरवात होणार असून या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी लक्ष्मणराव गमे सर्वाधिकारी गुरुकुंज आश्रम मोझरी खा डॉ नामदेव किरसान खासदार चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्र मितेश भांगडीया माजी आमदार आ बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमूर विधानसभा आ रामदासजी आंबटकर आमदार विधान परिषद आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून मिथुन गुरनुले यात्रा महोत्सव अध्यक्ष विठ्ठलराव सावरकर अध्यक्ष गुंफा समिती गिरीजाबाई गायकवाड सरपंच उपस्थित राहणार आहेत तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती राहनार आहे सकाळी रामधून व पालखी मिरवणूक निघणार आहे त्यानंतर ध्वजारोहण ,रामधूनच्या विषयांवर मार्गदर्शन त्यानंतर पालखी सत्कार व पालखी श्रमदान यज्ञ संपन्न होणार आहे
सदर कार्यक्रमा अंतर्गत दि 13 जाने ला उद्या भव्य असे मोफत आरोग्य तपासणी शिबिर तथा मोफत औषधी वितरण शिबिराचे आयोजन केले आहे तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे यात नामांकित तज्ज्ञांची उपस्थिती राहणार आहे असून परिसरातील नागरिकानी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन गुंफा समिती व गुंफा यात्रा समितीने केले आहे यानंतर स्वरगुरुकुंजचे, श्रीगुरुदेव गुंफा यात्रा महोत्सव समितीची निवडणूक आणि लगेच मार्गदर्शन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार.