तालुका मेडिकल ऑफ इलेक्ट्रोहोमिपथि असोशीएशन तर्फे कॉउन्ट सिझर मेटी जयंती साजरी
तालुका प्रतिनिधी
चिमूर
येथील तालुका मेडिकल ऑफ इलेक्ट्रोहोमिओपथि कडून चिमूर येथे शनिवारला काऊंट सिझर मेटी यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी अध्यक्ष डा. सातारडे डा.दीपक दडमल उपस्थित होते.
या प्रसंगी प्रतिमेला दीप प्रज्वलीत करून मल्यारपण करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना डा.मेटी यांच्या कार्याची माहिती दिली.इटली मधील कॉउन्ट सिझर मेटी यांनी 1865 मध्ये अनुपम, गुणकारी, निर्दोष , सरळ, स्वतंत्र प्राकृतिक, आणि पुर्ण वैज्ञानिक सिद्धांतावर आधारीत एक पुर्ण चिकित्सा पद्धतीचा शोध लावला,अत्यंत जटिलातील जटिल बिमारी शुध्द वनस्पती पासून तयार करण्यात आलेली इलेक्ट्रोहोमीओपॉथी औषध निर्मित करून मनुष्य हानी न होता कटीनातील कटीन बिमारी पुर्णपणे नाहीशी करणारी औषधे निर्माण करणारे माहाण वैज्ञानिक कॉउन्ट सिझर मेटी होते.
या प्रसंगी डा.सूरकार,डा.वासनिक,डा.मेश्राम ,डा.शंभरकर,डा. शेडमाके,डा.मेश्राम आदी उपस्थित होते.