लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनचे एक सकारात्मक पाऊल
ग्रामीण विद्यार्थ्यांकरिता उज्वल भविष्य मार्गदर्शन कार्यक्रम
घुग्घुस ७ जानेवारी २०२५ मंगळवार रोजी लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक उल्लेखनीय पाऊल उचलले आहे. जनता विद्यालय घुग्घूस येथे आयोजित केलेल्या उज्वल भविष्य मार्गदर्शन कार्यक्रमाद्वारे लॉयड्स इंफिनाईट फाउंडेशनने या विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
आजचे युग आणि स्पर्धा
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा आहे. या परिस्थितीत, शिक्षण आणि कौशल्य विकास हीच यशस्वी होण्याची चावी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्यासाठी आवश्यक असलेल्या संधी आणि मार्गदर्शनाची कमतरता असते.
लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनचे योगदान
लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनने या गरजेला ओळखले आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी पुढाकार घेतला.या कार्यक्रमाद्वारे, विद्यार्थ्यांना विविध भविष्य उज्वल पर्यायांबाबत माहिती मिळाली आणि त्यांच्या भविष्यातील ध्येय निश्चित करण्यास प्रोत्साहन मिळाले.
यावेळी १० वी तील विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मार्गदर्शन व भविष्यात कोणते क्षेत्र निवडायचे! कसे निवडायचे! का निवडायचे व भविष्यात त्याचे महत्व कसे राहतील! याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड सुद्धा वितरित करण्यात आले. या कार्यक्रमात ३०२ विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन उपव्यस्थापक श्री. दिपक साळवे यांनी केले. सदर कार्यक्रम उदघाटन प्रसंगी बोलताना विद्यार्थी यांनी अभ्यास करून प्राविण्य मिळवावे जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील अशा विद्यार्थ्यांना लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन यांच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्यात येईल, त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळ आरोग्यावर अधिक लक्ष द्यावे भविष्यात शैक्षणिक विकासा करिता सी.एस.आर (CSR) निधी ची विशेष तरतूद करण्यात आली आहे.
तर अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापक श्री. व्ही. पोले पाहुणे म्हणुन लॉयड्स मेटल्सचे, श्री. अनुराग मत्ते, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.