‘आप’चे अमित बोरकर व ‘काँग्रेस’चे गणेश उईके शिवसेनेत…

0
72

‘आप’चे अमित बोरकर व ‘काँग्रेस’चे गणेश उईके शिवसेनेत…

शिवसेना स्वबळावर नगरपरिषद निवडणूक लढविणार : संदीप गिऱ्हे

घुग्घूस : शहरातील आम आदमी पक्षाचे माजी शहराध्यक्ष अमित बोरकर, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गणेश उईके, पवन नागपुरे यांनी काल दिनांक 08/01/2024 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे व हेमराज बावने यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश घेतला.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी नगरपरिषदेच्या सर्वच 22 जागेवर निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला असून शहरातील पहिला नगर अध्यक्ष हा शिवसेनेचा असणार अशी आशा व्यक्त केली आहे.

याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रभाकर चिकणकर, सुधाकर चिकनकर, अजय जोगी, शहर प्रमुख बंटी घोरपडे, योगेश भांदककर, रघुनाथ धोंगळे, वेदप्रकाश मेहता व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here