घुग्घुस भाजपाच्या सदस्यता नोंदणी महाअभियानाला सुरवात
देशगौरव मोदीजींच्या स्वप्नातील विकसित भारत घडविण्यासाठी भाजपाचे सदस्य व्हा : विवेक बोढे
घुग्घुस : भाजपा घुग्घुसतर्फे भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या नेतृत्वात आयोजित सदस्यता नोंदणीचे महाअभियान ५ जानेवारीपासून ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातून रॅलीद्वारे सुरु करण्यात आले.
पक्षकार्य वाढविण्यासाठी शहरातील प्रत्येक बुथवर किमान २५० सदस्यता नोंदणी व्हावी हा उद्देश घेऊन शहर भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले.
झोपडपट्टीत राहणारे गरीब कुटुंब, हातठेला चालक, चायनीज दुकानदार, चहा विक्रेते, फुटपाथ दुकानदार, ऑटो चालक, डग्गा चालक यांना भाजपाचे सदस्य बनविण्यात आले आणि त्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरून देण्यात आले. याप्रसंगी भाजपा सदस्य नोंदणी महाअभियानाला नागरिकांचा मोठया प्रतिसाद मिळाला. भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी देशगौरव मोदीजींच्या स्वप्नातील विकसित भारत घडविण्यासाठी भाजपाच्या सदस्यता नोंदणीत नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
यावेळी भाजपाचे संजय तिवारी, माजी सभापती नितु चौधरी, माजी सरपंच संतोष नुने, माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहणे, सिनू इसारप, सुचिता लुटे, भाजपा जिल्हा सचिव विनोद चौधरी, बबलू सातपुते, संजय भोंगळे, नितु जैस्वाल, हसन शेख,श्याम आगदारी, श्रीकांत सावे,रत्नेश सिंग, संकेत बोढे, प्रणय काटवले,गणेश राजूरकर आदींची उपस्थिती होती.