घुग्घुस येथे श्री संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
घुग्घुस : येथील नवीन स्थापन झालेल्या तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवा संस्थेतर्फे पुराना बसस्थानकाजवळील बांगडे प्रतिष्ठान येथे मानवतेची शिकवण देणारे थोर संत श्री संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे, श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवा संस्था घुग्घुसचे अध्यक्ष दिनेश बांगडे, उपाध्यक्षा वैष्णवी बोंमले, कोषाध्यक्ष शैलेश बांगडे, सचिव अनिल नित, सहसचिव प्रकाश सुरकार, सल्लागार हेमराज बोंमले, संतोष ढेंगळे, निलेश लांजेवार, अनघा नित, यामिनी सुरकार, पौर्णिमा लांजेवार, माहुरे सर, पंकज बोंमले, विना बांगडे, अनिता कोहळे, रिता पेठे, नैना बोंमले, अंजली ठाकरे व मोठया संख्येत समाज बांधव उपस्थित होते.