आ. जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
घुग्घुस शहरातील आ.किशोर जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण अर्पण करुन मान्यवरांनी अभिवादन करण्यात आले.
माजी उपसरपंच संजय तिवारी यांनी आपले मनोगत व्यक्त करीत म्हणटले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री मुक्ती चळवळीच्या प्रणेत्या, अत्याचारितांच्या समर्थक आणि प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कर्त्या म्हणून त्यांचा वारसा कमी करणे अशक्य आहे. निरक्षर स्त्री शिक्षण घेईल, शिक्षिका बनेल आणि वर्षानुवर्षे त्रस्त असलेल्या स्त्रिया आणि शूद्रांसाठी अज्ञानाचा अंधार दूर करेल ही कल्पना भारतीय इतिहासाच्या दोन सहस्र वर्षात अतुलनीय आहे.
शिक्षणाच्या क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रात पदार्पण करावे, दुष्काळात अन्नान्न करून तडफडणाऱ्या हजारो जिवांच्या मुखांत घास भरवावा, शेतकरी सामाजिक सुधारणांसाठी वाङ्मयाचे साधन हाती घेऊन कवयित्री आणि लेखिका बनावे, सर्व गाव, सर्व समाज सुशिक्षित, सुसंस्कृत करण्याचे, जनावरांप्रमाणे जिणे जगणाऱ्या स्त्री-शूद्रांना माणसात आणण्याचे वेड घ्यावे, पतीच्या निधनानंतरही शोक करीत न बसता सत्यशोधक समाजाच्या तत्त्वप्रसाराचे कार्य करण्याचे सतीचे वाण घेऊन अविश्रांत काम करावे,दीनदलितांसाठी, दीनदलितांच्या मुलांसाठी रोगांच्या साथीत दिवसा-रात्री घराबाहेर धावावे, त्यांची सेवा करावी, प्लेगच्या साथीत दत्तकपुत्र यशवंतराव फुले यांना कडेवर घेऊन प्लेगने त्रस्त असल्यामुळे रुग्णालयात आणले. आजारपणाने स्वताला खिळले आहे याची जाणीव होऊन सुद्धा सावित्रीबाई रुग्णांना मदत करत राहिल्या, व प्रक्रियेत अनंतासाठी विलीन झाल्या. अशा व्यक्तिमत्त्वाचे वर्णन केवळ अलौकिक म्हणून केले जाऊ शकते.
माजी.उपसरपंच संजय तिवारी,निरिक्षण तांड्रा,संतोष नुने, अनिल बाम,श्याम आगदारी,नविन मोरे,स्वप्निल वाढई,
रवी वासेकर पृथ्वीराज आगदारी,सौ.उज्वला उईके,सोनु कमतवार, सुरेखा तोडसे, नितुताई जयस्वाल,संध्या जगताप, कामिना देशकर, सुशीला डकरे, अलका भांडारकर, माया मांडवकर, सुनंदा सौदारी आदी उपस्थित होते.