आम्रपाली बुध्द विहार येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

0
98

आम्रपाली बुध्द विहार येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 

घुग्घुस येथील आम्रपाली बुध्द विहार येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून मान्यवरांनी अभिवादन करण्यात आले. तसेच सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आले.

याप्रसंगी प्रतिमा पथाडे, परागे टीचर,दीक्षा भगत, सुरेखा टिपले, चंदाताई चांदेकर यांनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले त्यांनी कशाप्रकारे हाल अपेष्टा सहन करून मुलींची शाळा काढली आणि कशाप्रकारे त्या वेळेच्या अडचनिंना समोर जाऊन सर्व महिला शिकून सक्षम व्हाव्यात हा उद्देश ठेवून सावित्रीमाई फुलेंनी छान काम केले त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन सर्वांनी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे अनुसरण करावे. असे सर्वांनी थोडक्यात पण छान भाषणं दिली. संचालन सुरेखा टिपले यांनी केले.
सलोनी बेले, प्रीती बेले, लता बेले, पौर्णिमा धुपे, रीना चोखांद्रे, भावना कांबळे, शीतल तीतरे, निता वानखेडे,संगीता पाटील, सोनाली बहादे, सुवर्णा वाघमारे, मालन साठे,यशोधा पथाडे, रखमाबाई पथाडे, विमल पाझारे,शिला ढेमरे, माया धोटे,जिजा पाटील,रत्नमाला पखाले, सुचीता गाडगे,कविता सोनटक्के, अर्चना पुसाटे,सरोज मून,तृपिना भगत, रजनी आमटे,रेखा निमसटकर, वैशाली भालशंकर, गिरजा वाघमारे, वंदना वैरागडे, मधुकर पाझरे,गणपत गायकवाड, महादेव पखाले, मधुकर पथाडे, गोपीचंद पाझारे,बंडू रामटेके इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here