मोतीबिंदू शिबिरात ९८ नागरिकांची शस्त्रक्रियेसाठी निवड
नांदा फाटा येथील शिबिरात ६४८ नागरिकांची नेत्र तपासणी
नांदा फाटा :- लायन्स आय सेंटर वर्धा, लायन्स क्लब चंद्रपूर, महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर व संजय मुसळे मित्रपरिवार तथा भारतीय जनता पार्टी यांचा संयुक्त विद्यमाने नांदा फाटा येथे विनामूल्य मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विजयालक्ष्मी डोहे, माजी नगराध्यक्ष गडचांदूर, संजय मुसळे तालुका अध्यक्ष भाजपा, दिलीप भंडारी, पुरुषोत्तम निब्रड, डॉ संकेत शेंडे, डॉ अनघा पाटील, अशोक झाडे उपाध्यक्ष भाजपा, प्रमोद कोडापे भाजपा महामंत्री, दिनेश खडसे भाजयुमो अध्यक्ष कोरपना, विजय रणदिवे महामंत्री, संजय नित, जनार्धन ढोले, प्रा.डॉ अनिल मुसळे, माजी उपसरपंच बंडू वरारकर, रामदास पानघाटे, व सेवाग्राम येथील डॉक्टर उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे हे कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्याने फोन द्वारे सर्व रुग्ण, नागरिकांना संबोधित केले त्यांनी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा सेवाभावी असून नुसतं राजकारणच नाही तर समाजाची सेवा करण्याची वृत्ती बाळगून नेहमी कार्यरत असतो असे बोलून कार्यक्रमाला न येवू शकल्याने दिलगिरी व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. सदर मोतीबिंदू शिबिरात ६४८ महिला व पुरूषांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणी अंती ९८ नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. प्रसंगी ५० नागरिकांना शस्त्रक्रियेसाठी सेवाग्राम येथे रवाना करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन सतीश जमदाडे यांनी केले तर प्रास्ताविक दिलीप भंडारी व आभार अक्षय मुसळे यांनी मानले. कार्यक्रमाचा यशस्वितेकरिता भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील युवकांनी परिश्रम घेतले.