शहरातील रस्ते, नाली, पाणी पथदिवे व पार्किंगची समस्या सोडवा : राजुरेड्डी
नगरपरिषद मुख्याधिकारी निलेश रांजणकर यांना निवेदनातून मागणी
घुग्घूस – शहर सध्या समस्यांचे माहेरघर झाले असून नगरपरिषद शहरातील विकास कामाकडे सतत निरंतर दुर्लक्ष करीत आहे. नगरपरिषदेने नागरिकांच्या समस्या तातळीने सोडवाव्या या मागणीला घेऊन काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांच्याशी बैठक घेत त्यांना शहरातील समस्या लक्षात आणून दिल्या व समस्या तातळीने सोडविण्याची विनंती केली.
जर नागरिकांच्या समस्या सुटल्या नाहीतर काँग्रेस तर्फे आंदोलन छेळण्याचा इशारा ही रेड्डी यांनी दिला आहे आजच्या बैठकीत खालील समस्या सोडविण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. आठवडी बाजारात येणाऱ्या नागरिका करीता पार्किंगची व्यवस्था करावी. चंद्रपूर रोड वरील साईनगर कडे उतरणाऱ्या वळण रोडवर मुरूम अथवा वेकोलीचे ओबी टाकण्यात यावे. व शहरात ज्या – ज्या ठिकाणी असे क्रॉसिंग वळण रस्ते आहे त्यांची चौकशी करून ओबीचा भरणा करावा ही विनंती. शहरात अनेक ठिकाणी केबल टाकण्याचे कामं झालेली आहे त्याठिकाणी खड्डे खोदण्यात आले ते विझवले गेले नाही. तातळीने ते खड्डे विजविण्यात यावे. शहरातील रस्त्याच्या बाजूला असलेले धूळ कचरा व जंगली झाडं झूडपे स्वच्छ करावी. वॉर्ड क्रं 06 येथील नळाची पाईपलाईन फुटलेली असून ही तातळीने दुरुस्त करावी व शहरातील सर्व पाईपलाईन तपासून घ्यावे.
शहरातील संपूर्ण अकरा प्रभागातील नाल्या व गटारी यांची चौकशी करून तुटलेल्या नाल्यांची दुरुस्ती करावी व नवीन नाल्या बनविण्यात यावे. शहरात अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट (पथ दिवे ) बंद अवस्थेत असून ते चालू करण्यात यावे. शहरातील कचराकुंडी ज्याठिकाणी होते आणि सध्या आहेत त्याठिकाणी प्रचंड घाण पसरलेली आहेत. ती तातळीने स्वच्छ करण्यात यावे. शहरातील बंद अवस्थेत असलेल्या शौचालयांना चालू करण्यात यावे. शहरातील वॉर्ड क्रं 06 येथील निर्माण करण्यात आलेले व बंद स्तिथीत असलेले वाचनालय शुरु करण्यात यावे.
शहरातील संपूर्ण अंगणवाडीची स्वच्छता व बोरिंग दुरुस्ती करण्यात यावी. शहरातील सर्व बाल उद्यानाची चौकशी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावे. शहरात वाढत्या आजरांची दखल घेऊन डास / मच्छर यांची वाढता प्रकोप कमी करण्यासाठी शहरात जंतू नाशकाची फवारणी करावी. शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या मागील रस्ता हा पूर्णतः मोळकळीस आला असून हा रस्ता निर्माण करण्यात यावा याठिकाणी नाल्या नसल्याने वाहणाऱ्या पाण्यामुळे दवाखान्याची भिंत कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच याठिकाणी पथदिवे ही बंद असून रोडवर ब्रेकरची ही आवश्यकता आहे. या सर्व मागण्या शांतपणे ऐकून त्या सोडविण्याचा आश्वासन नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत.