घुग्घुस येथील आ. जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात नागरिकांशी समस्याशी संवाद…

0
83

घुग्घुस येथील आ. जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात नागरिकांशी समस्याशी संवाद…

 

घुग्घुस येथील दि.२८ डिसेंबर २०२४ शनिवार रोजी जनसंपर्क कार्यालयात मा.किशोरभाऊ जोरगेवार यांनी नागरिकांच्या विविध समस्यां जाणून घेतल्या.

परिसरातील गावा-गावातील नागरिकांनी अडचणीविषयी संवाद साधला होता.

आ.किशोरभाऊ जोरगेवार नागरिकांशी संवाद करतांना म्हणटले की,या अनेक प्रकारचे समस्यांचे त्वरीत निराकरण होण्यासाठी संबंधीत विभागांना आवश्यक दिशा- निर्देश दिले आहेत. मी आपल्याला विश्वास देतो की, लवकर अनेक समस्यांचे समाधान करणार.

समस्या ही लहान असो की, मोठी त्यातून बाहेर काढण्याचे मार्ग काढणार,आपल्या समस्या आपण कितपत परिणामकारकपणे आणि कार्यक्षमतेने सोडवू शकतो,यावर आपल्या जीवनातील यश अवलंबून असते. काही व्यक्तींच्या दृष्टीने छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा चिंताजनक समस्या असू शकतात. आपली इच्छा पूर्ण होत नाही, हे लक्षात आल्यावर काही व्यक्ती अती भावनाशील होतात व रडताना दिसतात. काही लहान मुले खेळणे मिळाले नाही म्हणून तणावाखाली जातात किंवा रडू लागतात. व्यक्ती जसजशी मोठी होत जाते, तसतशी तिची गरज व समस्या वाढत जातात. त्याच बरोबर अनुभवाने समस्या सोडविण्याचे कौशल्येही त्या व्यक्तीला प्राप्त होत असते ; माझाशी जेवढे जास्त समस्यांवर उपाय म्हणून लवकरच समाधान करणार.असेही मनोगत व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी सरपंच संतोष नुने, भाजपाचे नामदेव डाहुले, नवीन मोरे, सुरज मोरपाका, मयुर कलवल, मुन्ना लोढे, विजय माथनकर, सौ.उषाताई आगदारी, नितु जयस्वाल, निता मालेकर, सविता गोहणे, कामिनी देशकर, अनिता गोवर्धन अनेक कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here