आमदर देवराव भोंगळे यांच्या हस्ते कविटपेठ च्या सरपंचा विजया राठोड यांचा जाहीर पक्षप्रवेश…

0
90

आ. देवराव भोंगळे यांच्या हस्ते कविटपेठ च्या सरपंचा विजया राठोड यांचा जाहीर पक्षप्रवेश…

 

भारतीय जनता पार्टी शाखा विरूर स्टेशनच्या वतीने विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर गावात प्रथम आगमनाप्रित्यर्थ काल (दि. २७) आमदार देवराव भोंगळे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

विरूर वासीयांशी संवाद साधतांना विरूर पंचायत समिती परीसरातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करेन असे आ. भोंगळे यांनी आश्वस्त केले. विरूर वासीय आणि माझ्या तोलामोलाच्या कार्यकर्त्यांनी दिलेला सन्मान व प्रेम पाहून भारावून गेलो. खरंतर जनता जनार्दनाचे आशिर्वाद आणि भाजप-महायुतीच्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांचे परीश्रम यामुळेच हा क्षण पाहायला मिळाला आहे. राजुरा मतदारसंघातील जनतेला दिलेला विकासाचा शब्द पुढील पाच वर्षात पूर्ण करणार आणि आपण जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरविण्यासाठी अहोरात्र झटणार असा विश्वास ही याप्रसंगी आमदार भोंगळे यांनी विरूरकरांना दिला.

यावेळी कविटपेठ येथील कॉंग्रेसच्या सरपंचा विजया राठोड व शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते बालाजी राठोड, विरूर स्टेशन येथील उबाठा गटाचे तुषार मोरे, सुधाकर मोरे, मोरेश्वर कडूकर, अजय सिंह,अरुण गोगुलवार, किट्टी कमलवार, गणेश तुराणकर, विक्की मोरे, विवेक चांदेकर, टिंकू कस्तुरवार, आशिष शिलारकर, शिवडू कमलवार, गौरव जीवतोडे, अनिकेत गोरे, कार्तिक गोगुलवार, प्रवीण चहारे, मुंडीगेटचे अनिल भुकिया यांचेसह परीसरातील अनेकांनी भाजपात पक्षप्रवेश केला. त्यांचे मनापासून अभिनंदन करीत पक्षात स्वागत केले.

यावेळी आमदार देवराव भोंगळे समवेत मंचावर भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, तालुका उपाध्यक्ष सतिश कोमरवेल्लीवार, शाखाध्यक्ष भिमराव पाला, प्रदिप पाला, श्यामराव कस्तुरवार, रामअवतार सोनी, ललितकुमार सोनी, गुलाब ताकसांडे, सुरेंद्र वेलादी, सचिन बल्की, हितेश गाडगे, सत्यपाल दुर्गे, सचिन फटाले, चंद्रकला रणदिवे, विनोद ठमके, अर्चना कस्तुरवार, भारती मेश्राम, पोर्णिमा ठमके, स्वप्निल भोस्कर, तुषार मोरे, रूपेश कोमरवेल्लीवार आदींसह विरूरकरांची व परिसरातील ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here