विरुर स्टे. येथील शिवसेना (उबाठा) संपुष्टात
सर्व कार्यकर्त्या सोबत उप तालुका प्रमुख सुधाकर मोरे यांचा आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते पक्ष प्रवेश
कट्टर शिवसैनिक तुषार मोरे यांच्या सोबत अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये पक्ष प्रवेश
गेल्या अनेक वर्षा पासून शिवसेना (उबाठा) ला गावात जिवंत ठेवत निवडणुका व सामाजिक काम सुरू ठेवलेल्या तुषार मोरे यांनी जिल्हा व तालुका नेतृत्वाला कंटाळून अखेर पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला.
दादांच्या कार्य पद्धती वर प्रेरित होऊन या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला व आधी पेक्षा अधिक जोमाने सामाजिक व राजकीय कार्य करण्याचा संकल्प घेतला.
काल दिनांक २७ डिसेंबरला विरुर स्टेशन येथे नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे यांचा जाहीर भव्य सत्कार सोहळा पार पडला. यावेळी आपण विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे मत आमदार यांनी यावेळी उपस्थित जनतेशी संवाद साधताना व्यक्त केले.
यावेळी विरूर स्टेशन ग्रामीण परिसरातील ९ ते १० गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा आमदार भोंगळे यांच्या हस्ते पक्षप्रवेश झाला.