शब्दापेक्षा कृतीवर भर देणारे नेतृत्व हरविले : राजुरेड्डी
शहर काँग्रेसतर्फे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पित
घुग्घूस : देशाचे माजी अर्थमंत्री रिजर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 26 डिसेम्बर 2024 रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
आज दिनांक 27 डिसेम्बर 2024 रोजी घुग्घूस शहर काँग्रेस कार्यालयात त्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला
काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून श्रद्धांजली अर्पित करण्यात आले.
आपल्या शोक संदेशात काँग्रेस अध्यक्ष यांनी सांगितले कि सिंग साहेब हे शब्दापेक्षा कृतीवर भर देणारे नेतृत्व होते.
त्यांचा प्रामाणिकपना देश सदैव लक्षात ठेवील त्यांचा सारखा संयमी नेतृत्व यादेशात पुन्हा होणार नसल्याची खंत ही रेड्डी यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मधुकर मालेकर, सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, तालुका सचिव विशाल मादर,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, सुनिल पाटील, कुमार रुद्रारप, शहशाह शेख, अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.