मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीचे दोन महिन्यानंतर काय?
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
सहा महिन्याचा कार्यकाळ संपल्यानंतर उपासमारीची वेळ
तालुका प्रतिनिधी
चिमूर
महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक पात्रताधारक युवक आणि युवतींना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार सरकारकडून प्रशिक्षण घेण्याची संधी देण्यात आली.बारावी पास,पदविका आणि पदवी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अनुक्रमे सहा,आठ आणि दहा हजार रुपयांचे विद्यावेतन देण्याचे निश्चित केले.पण विद्यावेतन वेळेवर मिळत नाही.तसेच हे विद्यावेतन तटपुंजे असल्याने प्रशिक्षनार्त्यांची हेळसांड होऊन त्यांचेवर उपासमारीची वेळ आली असल्याने नियमानुसार काम आणि वेळेवर विद्यावेतन द्यावे.
त्याचप्रमाने प्रशिक्षणाचा कल संपल्यावर दोन महिन्यानंतर आमचे काय होणार,आमच्यावर उपासमारीची वेळ येणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या बाबत उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे.महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कौशल्य व उद्योजकता विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणी आमचे लाडके भाऊ यांनी जिथे काम करत आहेत तिथेच कायमस्वरूपी होतील. असे आश्वासन दिले . हे आश्वासन पूर्ण करावे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी केलेल्या भाषणात लाडके भाऊ आणि बहिणीच्या योजना आणि त्यांना दिलेली आश्वासन यांना प्राथमिकता दिली जाईल,असे म्हणून युवक आणि युवतींच्या आशा पल्लवित केल्या आहेत.या आशा निराशेत रूपांतरित होऊ न देता कायमस्वरूपीत नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे.
प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतींच्या मागण्या
मानधनात दुपट्ट वाढ करण्यात यावी.प्रशिक्षणार्थींना आहे त्या आस्थापनेवर कायमस्वरूपी करण्यात यावे. सुट्ट्या शासकीय नियमाप्रमाणे देण्यात यावे.ओळखपत्र देण्यात यावे. बेसिक नुसार कपात करण्यात यावी.आणि इतर भत्ते लागू करण्यात यावे अशी मागण्या उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदातून केल्या आहेत.