घुग्घुस येथील गोवंश तस्करांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

0
115

घुग्घुस येथील गोवंश तस्करांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जनावरांसह १९,१८००० मुद्देमाल घेतला ताब्यात

 

२३ डिसेंबर २०२४ रोजी गोवंशीय जनावरे ट्रक क्रमांक सी.जी.२४ एस २६७२ मध्ये कोंबून घुग्घुसकडे जात असल्याची गुप्त माहिती मिळाली.
घुग्घुस येथुन अंदाज १३ किलोमीटर अंतरावरील धानोरा फाटा येथे नाकाबंदी करत, पेट्रोलिंग दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी धडक कारवाई करत ट्रक सह ४५ गाय, बैल व ट्रकसह १९,१८००० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच दोन आरोपींना घुग्घुस पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

४५ नग जनावरे एक गोशाळा, दाताळा येथे हलवण्यात आली.

घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम व प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे.

एस.डी.पी.ओ. (SDPO) यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली. ही कारवाई गोवंश तस्करी रोखण्यासाठी महत्त्वाची ठरली असून जनावरांच्या संरक्षणासाठी कठोर पाऊले उचलण्याचा संदेश दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here