वाघाच्या हल्ल्यात महिला ठार ; कविटपेठ येथील घटना

0
153

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार ; कविटपेठ येथील घटना

स्थानिक जनतेत वनविभाग विरोधात प्रचंड असंतोष

 

विरुर स्टे./राजुरा, २३ डिसेंबर :- विरूर स्टेशन वनहद्दितील कविटपेठ येथील शेतात काम करत असलेल्या महिलेवर हल्ला करून ठार केल्याची घटना आता ४:३० घडली

मृत महिलेचे नाव लाळूबाई अर्जुन आत्राम (अंदाजे ६५ वर्ष) असे असून सदर महिला शेतात काम करत असताना वाघाने हल्ला करून जागीच ठार केले.

गेल्या महिनाभरापासून या परिसरात वाघाची दहशत कायम आहे. परिसरात सर्व शेतकरी असल्याने शेतात जाऊन काम करणेही शेतकरी व शेती मजुरांना जीवावर बेतनारे ठरत असल्याने शेतकऱ्यांनी काय करावे..? हा मोठा प्रश्न आहे.

वनविभागाला याची माहिती असतानाही वनविभागाकडून वाघास जेरबंद करण्याची कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याने परिसरातील जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. अखेर कविटपेठ येथील सदर शेतकरी महिलेचा निष्पाप नाहक बळी वाघाच्या हल्ल्यात गेला आहे. दरवर्षी शेती हंगामात सुरू असताना वाघाची दहशत कायम असल्याने वनविभाग स्थानिक परिसरातील शेतकरी व मजुरांच्या जीवावर उठले आहे का..? हा प्रश्न स्थानिक शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. वनविभागाच्या असंवेदनशील कार्यप्रणालीमुळे आज एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.

सदर वाघाला तातडीने जेरबंद करण्याची मागणी स्थानिक जनतेकडून केली जात असून सदर महिलेच्या कुटुंबातील एका व्यक्तीस वनविभागात नोकरीला घेण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here