अल्ट्राटेक प्रशासनाकडून कामगाराची होत असलेली पिळवणुकीचा मुद्दा गाजला विधानसभेत

0
109

अल्ट्राटेक प्रशासनाकडून कामगाराची होत असलेली पिळवणुकीचा मुद्दा गाजला विधानसभेत

आमदार देवराव भोंगळे यांनी वेधले लक्ष

 

गडचांदूर (कोरपना) :- कोरपना तालुक्यात ८० च्या दशकात अल्ट्राटेक सिमेंट (एल अँड टी) उद्योगाने पाय रोवले. स्थानिक शेतकऱ्यांनी कसलाही विरोध न करता आपल्या क्षेत्रातील बेरोजगार तरुणांचा हाती रोजगार येणार आणि तो पिढ्यान् पिढ्या कायम राहणार या उद्देशाने आपल्या शेती अल्प दरात कंपनीचा घशात घातल्या परंतू आज घडीला परिस्थिती वेगळी असून ज्या शेतकऱ्यांची मुलं या कंपनीत लागले होते ते आता कामावरून निवृत्त झाले. त्याचा मुलांना कामावर कंपनी प्रशासन घायला तयार नाही तर ज्यांना घेतले आहे, त्यांना बरोबर रोजी द्यायला तयार नाही. त्यामुळे मागील अनेक दिवसापासून कंपनी प्रशासनाकडून कामगाराना वेठीस धरून पिळवणूक होत आहे. काम करा अन्यथा घरी बसा ही पॉलिसी कंपनी प्रशासन वापरल्या जात आहे.

एवढेच नाही तर अनेकांनी कामगारांमध्ये फाटा फूट करून आपल्या हीताकरिता विविध कमागार संघटना उभा केल्या परंतू पाहिजे त्या प्रमाणावर अजूनही यश आले नसून परिस्थिती जैसे-थे आहे. परंतू याकडे मुत्सद्दी कामगार संघटना वेळोवेळी आपले धोरण बदलून विविध पक्षांना पाठिंबा देऊन कामगारांची हेळसांड करत आहे. या पूर्वी कंपनी प्रशासनाच्या गेट समोर 264 लोडर कामगार घेऊन आंदोलन देखील केले होते. परंतू कठोर प्रशासन जुमानत नसून कामगाराचे रोजंदारी प्रश्न कायम आहे. यामुळे आमदार होताच देवराव भोंगळे यांनी थेट कामगार पिळवणूकीचा मुद्दा विधानसभेत मांडून सर्वाचे लक्ष वेधले.

तसेच 30 वर्षापासून सिमेंट उद्योग सुरू असून या उद्योगातून निघणारा धूर मोठ्या प्रमाणावर सोडला जातो त्यामुळे येथील भाग हा प्रदूषित झाला असून मोठ्या प्रमानावर प्रदूषण पसरले आहे. याचा फटका शेतकऱ्यांच्या शेतीवर होत असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. जमिनीची पोषकता बीघडली असून पिकांवर अनेक रोग येत असल्याने उत्पादनात घट झाली आहे. तसेच प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम सुद्धा होत आहे. त्वचेचे रोग, श्वसन नलिका, हृदयाचे आजार, अधिक प्रमाणावर दिसून येत आहे. यावर अजूनही कंपनी प्रशासनाने कोणत्याही ठोस उपाययोजना राबवित नसून थातूरमातूर कृषी व आरोग्यावर आधारित कार्यक्रम घेऊन काही मोजक्या लोकांना खूष करण्याचे काम सुरू आहे. हा मुद्दा सुध्दा विधानसभेत गाजला असून योग्य व रास्त मुद्दा मांडल्याने परिसरातील कामगार व शेतकऱ्यांमध्ये नवनियुक्त आमदार देवराव भोंगळे कर्तव्य दक्ष असल्याची भावना व्यक्त केल्या जात आहे.

“कंपनी प्रशासनाकडून कामगारांची होत असलेल्या दडपशाही धोरणा विरोधातील ज्वलंत प्रश्नाला थेट विधानसभेत वाचा फोडली असून येत्या काळात आमदार साहेब कामगार व शेतकरी यांच्या हिताच्या दृष्टीने नक्कीच पुढाकार घेऊन या भागातील शेती व बेरोजगारीचा प्रश्न सोडवतील.” संजय मुसळे, अध्यक्ष भाजपा कोरपना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here