संविधान प्रतीकृतीचा अवमान करणार्‍यांवर कारवाईची मागणी-जिल्हाध्यक्ष जयप्रकाश कांबळे

0
104

संविधान प्रतीकृतीचा अवमान करणार्‍यांवर कारवाईची मागणी – जिल्हाध्यक्ष जयप्रकाश कांबळे

चंद्रपूर(प्रति)-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चंद्रपूर जिल्हा शाखेच्या वतीने दि. 20/12/2024 रोजी ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दशने व धारणा आंदोलन परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जवळ असलेल्या संविधान पुस्तिकेचे अवमान करणारे समाजकंटकावर कारवाई करण्यात यावी आणि परभणी येथे आलेल्या अंदोलनादरम्यान तरुण युवक सोमनाथ सुर्यवंशी या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांवर परभणी येथील पोलिसांनी अमानुष पणे मारहाण करन खुन करण्यास पोलिस जबाबदार आहेत त्यामुळे सदर दोषी असलेल्या पोलिसावर मनुष्यवधाचा गुन्हा तातडीने दाखल करावा आणि आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात आंबेडकरी चळवळीच्या कार्यकत्यावर कोम्बींग ऑपरेशन करुन त्यांच्यावर खोटे गुन्हे लादण्यास राज्य शासन जबाबदार असल्यामुळे तातडीने गुन्हे मागे घ्यावे. तसेच सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटूंबाला 50 लाखाची मदत करावी याकरीता रिपाईच्या वतीने निदर्शने करुन सदर मागण्याचे निवेदन चंद्रपूर जिल्हाधिकरी यांना सादर करण्यात आले.

याप्रसगी शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष जयप्रकाश कांबळे सोबत जिल्हा उपाध्यक्ष ॅअ‍ॅड. विनोद वानखेडे वरोरा, यशवंत उके विदर्भ प्रदेश सचिव, चंद्रपूर शहर अध्यक्ष राजू भगत, धर्मे नागदेवते बल्लापूर तालुका अध्यक्ष, प्रविण देठैकर, जिल्हाध्यक्ष कामगार आघाडी, प्रविण डोर्लीकर बल्लारपूर शहर अध्यक्ष, पुष्पाताई मोरे जिल्हाध्यक्षा महिला आघाडी, बाळू आंबेकर, नामदेव साव, राजू काळे, नामा अली, कैलाश कुमार पाटील, सिध्दार्थ मुंजेवार, शरद वनकर, सिध्दार्थ वावरे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here