विरूर वासीयांनी वाहिली गाडगेबाबा याना आदरांजली
अविनाश रामटेके
विरूर स्टेशन
वैराग्यमुर्ती राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित्त राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन विविध कार्यक्रम आयोजित करीत त्यांना स्मरण करीत त्यांच्या कार्यना उजाळा देत गाडगेबाबा यांना आदरांजली वाहण्यात आली .
विरूर स्टेशन येथील परीट समाज बांधवांनी एकत्र येत मागील कित्येक दिवसापासून संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती व पुण्यतिथी दिनी स्मरण करीत विविध कार्यक्रम आयोजित करीत असते ,त्याच अनुषंगाने आज गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्य त्यांना स्मरण करीत अभिवादन करण्या करिता विरूर वाकिंग क्लब च्या सहकार्याने ग्रामस्वछता अभियान राबविण्यात आले यावेळी नेहमी प्रमाणे विरूर वाकिंग क्लब चे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित राहून नियोजित संत गाडगेबाबा महाराज भूमीवर साफसफाई करण्यात आले ,त्यानंतर संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजाअर्चना करून पुष्पमाला अर्पण करण्यात आले व एक मिनिटांचा मौन धारण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी अनिल आलाम सरपंच विरूर, सौ प्रीती पवार उपसरपंच विरूर स्टेशन ,अविनाश रामटेके तंटामुक्त अध्यक्ष विरूर स्टेशन , अजय रेडी ,ज्ञानेश्वर तुरणकार ,अजित सिंग टाक ,विलास निमलावर ,,सत्यपाल मेडपलीवर , प्रदीप पाला ,संगेश पावडे, गजानन ढवस ,नयन उराडे शुभम उराडे ,राकेश रामटेके , बंडू झाडे ,सुनील मोरे ,संदीप ठमके, बोरकर मॅडम ,सौ संगीत भोसकर ,सौ सरिता रेडी ,सौ प्रियांका रामटेके ,अनिता निमलावर ,प्रतिभा तुरणकार ,तेजस्विनी चिंचोळकर आदी उपस्थित होते.