केंद्रीय गृहमंत्र्यांचे विधान देशासाठी वेदनादायी – खा. प्रतिभा धानोरकर
दिल्ली येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या विधानाचे पडसाद देशभर उमटू लागले आहे. इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा वक्तव्याचा संसदेबाहेर निर्दशने करुन निषेध केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना संविधानावरील चर्चे दरम्यान आपण आंबेडकर-आंबेडकर करता हि फॅशन झाली आहे. त्या ऐवजी देवाचे नाव घेतल्यास स्वर्गात जागा मिळेल असे विधान करुन संपुर्ण देशवासीयांच्या भावना दुखावल्या असल्याची खंत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली. कॉग्रेस सहीत सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांनी भारतरत्न डॉ. भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमा हातात घेऊन केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाचा निषेध केला. या संदर्भात या वक्तव्याप्रती केंद्रिय गृहमंत्री यांनी देशवासीयांची माफी मागावी व संविधान निर्माण करणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक व्हावे अशी भावना देखील खासदार धानोरकर यांनी व्यक्त केली.