प्रियदर्शिनी कन्या विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयात भव्य विज्ञान प्रदर्शनी

0
6

प्रियदर्शिनी कन्या विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयात भव्य विज्ञान प्रदर्शनी

विज्ञानाच्या प्रगतीमुळेच भारताची महासत्तेकडे वाटचाल – वाय जी एस प्रसाद

 

घुग्घुस दि.१८ डिसेंबर २०२४ बुधवार रोजी प्रियदर्शिनी कन्याविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भव्य विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनी म्हणजेच विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना दिशा देणारे, व्यासपिठ असुन विज्ञानाच्या प्रगतीमुळेच भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरु असल्याने या विद्यार्थ्यांनीमधुनच भावी शासत्रज्ञ व्हावे असा मनोदय लाॅयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे युनिट हेड वाय.जी.एस प्रसाद यांनी व्यक्त केला.
श्री.साईबाबा ग्रामीण विकास संस्था,गडचिरोली द्वारा संचालित प्रियदर्शिनी कन्याविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित अपूर्व विज्ञान प्रियदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाॅयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे मुख्य उपाध्यक्ष श्री.प्रशांत पुरी,सामाजिक दायित्व विभाग प्रमुख श्री.दिपक साळवे,समाजसेवक राजूभाऊ रेड्डी,ब्रिजभूषण पाझारे,केंद्र प्रमुख श्री.दागमवार सर, प्राचार्य अनु खानझोडे,पर्यवेक्षक फाल्गुन खामणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना प्रशांत पुरी म्हणाले की,विज्ञान प्रर्दशनीमधुन विद्यार्थीनींची बुध्दीमता आणि संशोधनात्मक विचारांना चालना मिळते.त्यांनी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील अशा उपकरणांची निर्मिती करावी असे आवाहन केले.

यावेळी एकूण ५७ प्रतिकृतीमध्ये सुदृढ आरोग्य,संसाधन व्यवस्थापन आणि जलाशयाचे संरक्षण, वाहतूक व दळणवळण, गणितीय प्रतिकृती, प्रदुषण, सेंद्रीय शेती, शेतकऱ्यांना जोड व्यवसाय यावर आधारित प्रतिकृतीचे सादरीकरण केले.यावेळी राजूभाऊ रेड्डी, ब्रिजभूषण पाझारे यांनीही विद्यार्थींनीना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अनू खानझोडे यांनी,संचालन श्री.बलवंत विखार तर प्राध्यापक प्रकाश सातार्डे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.विज्ञान प्रदर्शनीला विद्यार्थ्यांनीचे पालक व ग्रामस्थांनी भेट देऊन विद्यार्थ्यांनीचे कौतुक केले.प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षक गजानन मोरे, सुधीर डांगे,प्रा.वैशाली जोशी, प्रा. आशीष धोटे सह विद्यार्थ्यांनीनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here