देवराव भोंगळे यांच्या भगीरथ प्रयत्नांना यश
लवकरच सुरु होणार बँक ऑफ इंडियाजवळील वेकोलिचा लोखंडी पूल
रेल्वेकडे कामासाठी जवळपास 3 कोटी 77 लाख 10 हजार रुपयाचा निधी वर्ग
घुग्घुस : शहरातील बँक ऑफ इंडियाजवळील वेकोलिचा लोखंडी पूल आमदार देवराव भोंगळे यांच्या भगीरथ प्रयत्नामुळे लवकरच सुरु होणार आहे.
रेल्वे पुलाच्या दुरुस्तीकरिता वेकोलितर्फे रेल्वेकडे जवळपास 3 कोटी 77 लाख 10 हजार रुपयाचा निधी वर्ग करण्यात येणार आहे.
वेकोलिचा लोखंडी पूल रेल्वे प्रशासनाने 29 मेपासून दुचाकीच्या रहदारीकरिता बंद केला. घुग्घुस वस्ती व वेकोलि वसाहतीला जोडणारा हा लोखंडी पूल आहे. या पुलावरून वेकोलि वसाहतीत राहणारे नागरिक दुचाकीने घुग्घुस वस्तीकडे ये-जा करीत होते.
घुग्घुस वस्तीत मोठी बाजारपेठ आहे. हा पूल बंद केल्याने घुग्घुस वस्तीतील व्यापाऱ्यांचा व्यवसाय ठप्प झाला. जवळपास 30 वर्षे जुना हा पूल असल्याने हा पूल जीर्ण झाल्याने रहदारी करिता बंद करण्यात आला.
वेकोलितर्फे नवीन लोखंडी पूल बनविण्यासाठी व्यापारी बांधवानी देवराव भोंगळे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्याअनुषंगाने देवराव भोंगळे यांनी क्षेत्रीय महाप्रबंधक आभास सिंग यांच्या कडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आणि वेकोलितर्फे नवीन लोखंडी पुलासाठी 3 कोटी रुपये रेल्वेकडे वर्ग करण्यात आले आहे.
वेकोलिचा लोखंडी पूल लवकरच रहदारी करिता सुरु होणार असल्याने आमदार देवराव भोंगळे यांचे व्यापारी मंडळाचे अध्यक्ष अनिल गुप्ता, सन्नी खारकर, आकाश निभ्रड, दिनेश बांगडे, साजन गोहने, पांडुरंग थेरे, आस्तिक गौरकार व समस्त व्यापारी बांधवानी आभार व्यक्त केले आहे.